‘बाळासाहेबांचा शेवटचा शब्द….’,आनंद दिघेंच्या पुतण्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

एकनाथ शिंदे यांचा गटच अधिकृत शिवसेना पक्ष ठरल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यापैकी एक प्रतिक्रिया सध्या प्रचंड चर्चेत आलीय ती म्हणजे दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांची.

Kedar-Dighe-On-Eknath-Shinde
एकनाथ शिंदे यांचा गटच अधिकृत शिवसेना पक्ष ठरल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यापैकी एक प्रतिक्रिया सध्या प्रचंड चर्चेत आलीय ती म्हणजे दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांची.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना बहाल केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचा गटच अधिकृत शिवसेना पक्ष ठरल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यापैकी एक प्रतिक्रिया सध्या प्रचंड चर्चेत आलीय ती म्हणजे दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांची. केदार दिघे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती प्रचंड व्हायरल देखील होताना दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय कारकीर्दीतील मोठी जोखीम स्वीकारत थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देत बंडखोरी केली आणि शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण दोन्ही शिंदे गटाकडे घेतलं. मात्र त्यानंतर दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंनी एकनाथ शिंदेंवर स़डेतोड टिका केलीय. या पोस्टच्या माध्यमातून केदार दिघेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या शब्दांची आठवण करून देत एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

“शिवसैनिकांना का म्हणाले होते बाळासाहेब… जसं मला सांभाळले तसं उद्धव आणि आदित्य ला सांभाळा… याच उत्तर आज मिळालं! त्यांनी शेवटचा आदेश शिवसैनिकांना दिला,आमदार खासदार यांना हा आदेश का नाही दिला..?याच उत्तर आज मिळालं.दैवी पुरुष असणाऱ्या बाळासाहेबांना माहीत होतं… आपल्या पाठीमागे आपलेच काही गद्दार आमदार आणि नेते हे सत्तेसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकटे पाडतील…” असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण जरी आपल्याकडे घेण्यात यश मिळवलं असलं तरी दिवंगत आनंद दिघेंना ते आपले गुरू मानतात, त्यांचेच पुतणे केदार दिघे हे मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच ठाम उभा असलेले दिसून येत आहेत. “भलेही नेते गेलेय…भाजपने पत्र आणि चिन्ह शिंदे गटाला दिले असेल…पण शिवसैनिक मातोश्री सोबत प्रामाणिक राहील आणि या गद्दारांना त्यांची जागा दाखवेल. काही झालं तरी बाळासाहेबांचा शेवटचा शब्द पडू द्यायचा नाही, शेवटचा आदेश तंतोतंड पाळायचा ही जबाबदारी आपली शिवसैनिकांची आहे”, असं म्हणत केदार दिघे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलंय.