आनंद महिंद्रांनी केलं राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचं कौतुक, व्हिडिओ शेअर करत दिली भन्नाट ऑफर

महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचं कौतुक केलं आहे. तसेच त्यांनी व्हिडिओ शेअर करत एक भन्नाट ऑफर दिली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी महिंद्रा कंपनीने आणलेल्या ई-ऑटोरिक्षाच्या लॉन्चिंगवेळी रिक्षा चालवण्याचा आनंद लुटला. रिक्षा चालवल्यानंतर त्यांनी ई-रिक्षा चालवलं खूप सोपं आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिली होती. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी देसाईंच्या ड्रायव्हिंगचं कौतुकं केलं. तसेच त्यांच्या व्हिडिओला रिट्विट देखील केलं आहे.

काय म्हणाले आनंद महिंद्रा ?

सुभाषजी तुम्ही आम्हाला महिंद्रा रेसिंग स्पर्धेत हवे आहात. तुम्ही लाल रंगाच्या रेसिंग सूटमध्येही खूप छान दिसाल. असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. ट्विटमध्ये असलेल्या व्हिडिओमध्ये सुभाष देसाई ई-ऑटो चालवताना दिसत आहेत.

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँण्ड महिंद्रानेही इलेक्ट्रीक कार सादर करणार असल्याचे म्हटले आहे. परंतु यापूर्वीही महिंद्राने राज्यात ई-रिक्षा लॉन्च केली आहे. मात्र, आता लॉन्च करण्यात आलेल्या रिक्षाची किंमत २ लाख ९ हजार रूपये ठेवण्यात आली आहे. तर या इलेक्ट्रीक रिक्षावर राज्याकडून ३० हजार रूपयांची सूट देखील दिली जाणार आहे.


हेही वाचा : माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे, गुलाबराव पाटलांची जीभ घसरली