Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र आनंद महिंद्रा म्हणतात, बालपणींच्या स्मृतींची चोरी झाली... मुंबई पोलिसांनी दिले हटके उत्तर

आनंद महिंद्रा म्हणतात, बालपणींच्या स्मृतींची चोरी झाली… मुंबई पोलिसांनी दिले हटके उत्तर

Subscribe

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर 1986पासून दिमाखात धावणाऱ्या बेस्टच्या डबलडेकर बसने शुक्रवारी (15 सप्टेंबर 2023) घेतला. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या खास शैलीत ट्वीट केले आणि आपल्या बालपणीच्या स्मृतींची चोरी झाल्याचे म्हटले आहे. पण मुंबई पोलिसांनी सुद्धा त्यांना हटके उत्तर दिले आहे.

- Advertisement -

मुंबईची शान असणाऱ्या बेस्टच्या डबलडेकर बस नियमाने मुदतबाह्य झाल्या होत्या. त्यामुळे बेस्टने एक-एक करून सर्व डबलडेकर बसगाड्या भंगारात काढल्या आहेत. शेवटची एक प्रवासी जुनी डबलडेकर बस शिल्लक होती. शुक्रवारी मरोळ आगारातील या बसने, आगरकर चौक ते सिप्स या 415 क्रमांकाच्या मार्गावर रात्रीच्या सुमारास प्रवास केला आणि मुंबईकरांचा शेवटचा निरोप घेतला आणि ती डबलडेकर बस इतिहासजमा झाली.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कारणामुळे फाइव्ह स्टार हॉटेलमधील मुक्काम शासकीय विश्रामगृहात हलवला

- Advertisement -

बेस्टच्या डबलडेकर बसने सीएसएमटी ते कुलाबा, मंत्रालय, चर्चगेट असा प्रवास करताना प्रवाशांना खूप मजा येत असे. बेस्टच्या हवेशीर डबलडेकर बसमधून सुखद प्रवासाचा मनमुराद आनंद प्रवासी घेत असत. त्याचप्रमाणे वांद्रे – अंधेरी असा उपनरांत देखील डबलडेंकर बसने प्रवास करण्याची मजाच काही वेगळी असे. हेच आनंदाचे क्षण आता इतिहास जमा झाले आहेत. म्हणून सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेले आनंद महिंद्र यांनी ट्वीट करत, माझ्या सर्वात महत्त्वाच्या बालपणीच्या स्मृतींची चोरी झाली असल्याची तक्रार करायची आहे, असे त्यांनी मुंबई पोलिसांना उद्देशून म्हटले आहे.

हेही वाचा – त्याच घोषणा आणि तीच फसवणूक… ठाकरे गटाची राज्य सरकारवर जोरदार टीका

मुंबई पोलिसांनी देखील त्याच स्नेहाने आनंद महिंद्रा यांना आपल्या ट्विटर हँडलवरून उत्तर दिले आहे. आम्हाला आनंद महिंद्रा यांच्याकडून ‘गोड स्मृतींची चोरी’ झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. आम्हाला चोरी स्पष्टपणे दिसत आहे, पण आम्ही ताब्यात घेऊ शकत नाही. त्या BESTच्या सुखद आठवणी तुमच्या आणि तमाम मुंबईकरांच्या हृदयात सुरक्षितपणे जपून ठेवल्या आहेत, असे उत्तर मुंबई पोलिसांनी दिले आहे.

- Advertisment -