Video : ‘तो’ व्हिडीओ शेअर करत उद्योगपती आनंद महिंद्रांचा नागरिकांना सावधानतेचा इशारा

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आनंद महिंद्रा अनेकदा आपल्या ट्विटद्वारे लोकांना तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचे फायदे सांगत असतात. नुकताच आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर करत लोकांना सावध केले आहे.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आनंद महिंद्रा अनेकदा आपल्या ट्विटद्वारे लोकांना तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचे फायदे सांगत असतात. नुकताच आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर करत लोकांना सावध केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) बद्दल इशारा दिला आहे. (anand mahindra tweeted ai generated fake video and warned people be careful from artificial intelligence)

“आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जगासाठी मोठी उपलब्धी असली तरी त्याचे घातक परिणामही होऊ शकतात”, असे आनंद महिंद्रा यांनी सांगितले. तसेच, आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे लोकांना कसे फसवले जाऊ शकते हे सांगितले आहे.

या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून कोणीही चुकीचे आणि बनावट व्हिडिओ कसे बनवू शकते हे सांगितले आहे. त्या व्यक्तीने व्हिडिओमध्ये AI च्या गैरवापराचे जिवंत उदाहरणही सादर करण्यात आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने संबंधीत व्यक्ती कधी विराट कोहली तर कधी शाहरुख खानचा चेहरा बदलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. हॉलिवूड अभिनेता आणि आयर्न मॅन हिरो रॉबर्ट डाउनी जूनियरचा चेहराही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे.


हेही वाचा – भारतातील पहिली नोजल कोविड लस 26 जानेवारीला होणार लॉन्च