वर्षा’वरील ‘बाप्पा’चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह ​​केले विसर्जन

CM Eknath Shinde Varsha Banglow Ganpati Visarjan 2022

गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाला निरोप देण्यात आला.

मोठ्या उत्साहात ढोल ताशांचा गजरात यंदा प्रथमच वर्षा हे निवासस्थान पूर्णपणे दुमदुमून गेलं होतं. मोठ्या उत्साहात आणि आनंदात बाप्पाची आरती केल्यानंतर त्याची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर बाप्पासाठी खास तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात श्री गणरायाचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

बाप्पाला निरोप देताना राज्यातील जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव तसेच राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुखी करण्याचे मागणे मुख्यमंत्री शिंदे यांनी श्री गणरायाकडे मागितले.

तसेच यंदा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणपतीचा सण निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल त्यानी समाधान व्यक्त केले. सण साजरे करण्यावरील निर्बंध हटवल्यामुळे लोकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला असून, बाजारात उत्साह पहायला मिळाल्याने सणावर उत्पन्न अवलंबून असलेल्या छोट्या मोठ्या सर्वच व्यावसायिकाना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, समन्वयक आशिष कुलकर्णी आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि संपूर्ण शिंदे कुटुंबीय उपस्थित होते.


कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील खजिन्यावरच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक