नाशिक : १४ जुलै रोजी चंद्रावर स्वारी करण्यासाठी अवकाशामध्ये झेपावलेल्या चंद्रयान ३ ( chandrayan 3) च्या पीएसएलव्ही या अवकाशयानाने तब्बल ३ लाख ८४ हजार ४०० किमी. अंतराचा प्रवास करून बुधवारी (दि. २३) आपल्या निर्धारित वेळेत चंद्रावर पाऊल ठेवलं… विक्रम लँडरचे ( Vikram lander) सॉफ्ट लँडिंग होताच अवघ्या देशभरातील अब्जावधी लोकांच्या व्हाट्सअप्प स्टेट्सचे चित्र क्षणार्धात बदलले. (India’s Chandrayaan-3 successfully landed on the moon)
सर्वत्र भारत माता की जय, जय हिंद, जय भारत, जय हिंदुस्थान अन् वंदे मातरम चा जयघोष आणि फटाक्यांच्या आतीशबाजीने अवघ्या भारताचा आसमंत दणाणून गेला. व्हाट्सअप्प, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर वरून तर इस्रोच्या वैज्ञानिकांवर शुभेच्छांचा अक्षरशः धो धो पाऊस पडू लागला. स्टेटस आणि अभिनंदनाच्या शुभेच्छांनी अनेकांचे मोबाईल अक्षरशः हँग झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लॅन्डर उतरविण्याची कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरल्याने तमाम भारतीयांच्याआनंदाला पारावर राहिला नाही. हा आनंद लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांसोबत उत्स्फूर्तपणे शेयर केला. विशेष म्हणजे सर्वांच्या स्टेटस मध्ये प्रचंड विविधता दिसत असली तरी त्या विविधतेतून प्रत्येकाच्या मनातला राष्ट्राभिमान अक्षरशः ओसंडून वाहत होता. त्यात बहुतेकांनी राष्ट्रध्वजा बरोबरच चंद्रयान ३, विक्रम लँडर, प्रज्ञान तसेच अग्निबाणाचे फोटो स्टेट्सला ठेवल्याचे दिसून आले.
अनेकांना तर भारतीय शास्त्रज्ञ विक्रम साराभाई आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. तरुणाईच्या कल्पकतेतून भारताच्या या यशाला इन्स्टाग्रामवर रिल्सच्या माध्यमातून अभिवादन केलेलेही दिसून आले. ट्विटरवर तर राजकीय नेते, अभिनेते, क्रीडापटू, वैज्ञानिक, उद्योजक, व्यवसायिकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या ट्विट्सचा अक्षरशः महापूर बघायला मिळाला. व्हाट्सअप्प वरील सचित्र संदेश तर बरंच काही सांगून जात होते. जणू काही एकप्रकारे संपूर्ण देश एक स्वरात अभिनंदन इस्रो म्हणत असल्याची अनुभूती आली.
एक तास 50 मिनिटानंतर बाहेर निघणार ‘प्रज्ञान’
चांद्रयान-3 चा विक्रम लॅंडर चंद्रावर यशस्वीपणे उतरले आहे. आता रोव्हर प्रज्ञान त्याच्या आतून बाहेर येण्याची वाट पाहत आहे. यास सुमारे 1 तास 50 मिनिटानंतर प्रज्ञान बाहेर निघणार आहे. उतरलेल्या ठिकाणावरील धूळ ओसरल्यानंतर विक्रम लॅंडर संवाद साधेल. त्यानंतर रॅम्प उघडेल आणि प्रज्ञान रोव्हर रॅम्पवरून चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. यानंतर त्याची चाके चंद्राच्या मातीवर ‘अशोक स्तंभ’ आणि ‘इस्रो’च्या लोगोची छाप सोडणार आहेत. त्यानंतर विक्रम लँडर प्रग्यानचा फोटो घेईल आणि प्रज्ञान विक्रमचा फोटो काढेल. ते हा फोटो पृथ्वीवर पाठविणार आहेत.