Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र ...आणि पोलिसांनी उधळला दोघांच्या खुनाचा कट; काय आहे 'आतली बातमी?'

…आणि पोलिसांनी उधळला दोघांच्या खुनाचा कट; काय आहे ‘आतली बातमी?’

Subscribe

नाशिक : मारहाणीचा बदला घेण्यासाठी पंचवटील आलेल्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली. टिप्पर गँगच्या ओम्या खटकीसोबत का राहतो, अशी कुरापत काढून टोळक्याने २६ जूनला केटीएचएम महाविद्यालयाजवळ सागर सोनारला मारहाण केली होती. मारहाण करणार्‍या टोळीच्या म्होरक्यासह त्याच्या जोडीदाराचा खून तीन जण पंचवटीत आल्याचे समोर आले आहे.

सागर हेमंत सोनार (१९, रा. चुंचाळे शिवार), तुषार बाळू खैरनार (२३, रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा) व आविष्कार रमेश घोरपडे (१९, रा. जि. जळगाव) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. इतर दोन संशयित अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत. संशयित सागर सोनारकडे कोयता, तुषार खैरनारकडे लोखंडी रॉड व अविष्कारकडे दोरी व मिरची पुड मिळुन आली.

- Advertisement -

पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित शनिवारी (दि. २६) रात्री कुमावतनगर येथील पाटाच्या परिसरात गोळा होऊन हृषिकेश गणेश परशे उर्फ ऋषीबाबा (रा. कुमावतनगर) याच्यासह त्याच्या जोडीदाराचा खून करणार असल्याची माहिती मिळाल्याने पंचवटी पोलिसांनी सापळा रचून तिघांना पकडले. हृषिकेश परशे याने इतर १५ ते २० जणांसह मिळून २६ जूनला टिप्पर गँगच्या ओम्या खटकीसोबत राहत असल्याची कुरापत काढून सागर सोनारला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर चार दिवसांनी हृषिकेशने कॉलवरून सागरला शिवीगाळ, दमदाटी केली होती.

दरम्यान, ज्याप्रमाणे ओम्या खटकीने त्याला मारहाण करणार्‍या संदीप आठवलेचा खून करून बदला घेतल्याची भावना व्यक्त केली, त्याचप्रमाणे आपल्याला मारहाण करणार्‍या हृषिकेश व त्याच्या साथीदाराचा खून करून बदला घ्यायचा असे सागर सोनारने ठरवले होते. त्यानुसार सागरसह पाच जणांच्या टोळीने पंचवटीत येत खुनाचा कट रचला. मात्र त्याआधीच पंचवटी पोलिसांनी त्यांना पकडले. याप्रकरणी संशयितांविरोधात दरोड्याची पूर्वतयारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी, दिनेश खैरनार, उपनिरीक्षक योगेश माळी, सहायक उपनिरीक्षक अशोक काकड, माळोदे आदींच्या पथकाने केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -