घरताज्या घडामोडीअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची धुरा आशिष शेलार यांच्या खांद्यावर

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची धुरा आशिष शेलार यांच्या खांद्यावर

Subscribe

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची धुरा भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व मतदार संघ रिक्त झाला आहे. त्यामुळे लवकरच या मतदार संघात पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून ही जबाबदारी आशिष शेलार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

पंढरपूर, कोल्हापूर या पोटनिवडणुकीनंतर आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या मतदार संघाची धुरा भाजपाने आशिष शेलार यांच्या खांद्यावर दिली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व मतदार संघ रिक्त झाला होता. त्यामुळे येत्या काही दिवसांत या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या निवडणुकीत शिवसेना विरूद्ध भाजप अशी जोरदार लढत होणार आहे. याआधीही शेलार यांनी मुंबई महापालिकेसाठी उत्तम कामगिरी बजावली आहे. आता पुन्हा एकदा भाजपाने आशिष शेलार यांना मैदानात उतरवले आहे.

भाजपाने ही निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे संकेत आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्याकडून मतदारसंघाचा आढावा घेतला होता. भाजपा या मतदारसंघातून पटेल यांना उमेदवारी देऊ शकते, असं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आमदार रमेश लटकेंच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -