घरताज्या घडामोडीअंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन

Subscribe

आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. आमदार रमेस लटकेंच्या निधानानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. आमदार रमेश लटके यांचं पार्थिक मुंबईत आणण्यासाठी तायरी सुरू असून लवकरच त्यांचं पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे. रमेस लटके हे 1997 साली प्रथम मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले.

आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. सलग दोन टर्म रमेश लटके हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके हे 2014 मध्ये अंधेरी पूर्वमधून महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी हे तिसऱ्या स्थानावर होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. त्यावेळी लटके हे 16 हजार 965 मतांनी विजयी झाले होते.

- Advertisement -

1997 मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून गेले. त्यानंतरच्या सन 2002 आणि 2009च्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले आणि महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुढच्याच 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार रमेश लटके यांना श्रद्धांजली

- Advertisement -

“शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, आमदार रमेश लटके लढवय्या शिवसैनिक होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी आपल्या कामाने लोकांची मने जिंकली होती. त्याच जोरावर ते आता सलग दोनदा अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. चांगला संपर्क असणारा, विकास कामांचा ध्यास घेतलेला, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. त्यांचे अकाली निधन हा त्यांच्या कुटुंबीयांवर आघात आहे. लटके कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आमदार रमेश लटके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


हेही वाचा – कापूस, सोयाबीनसाठी हजार कोटींचा निधी, राज्यात २७० टॅंकर्सनी पाणीपुरवठा, वाचा मंत्रिमंडळाचे निर्णय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -