Homeमहाराष्ट्रAndheri Sports Complex : अंधेरी क्रीडा संकुलातील हॉस्टेलच्या 18 खोल्या सील; कारण...

Andheri Sports Complex : अंधेरी क्रीडा संकुलातील हॉस्टेलच्या 18 खोल्या सील; कारण…

Subscribe

अंधेरी पश्चिममधील शहाजीराजे क्रीडा संकुलन प्रशासनाकडून एक निर्णय घेण्यात आला आहे. या क्रीडा संकुलनातील हॉस्टेलच्या खोल्यांचे भाडे, वीज आणि पाणी बिलाचे पैसे थकवल्यामुळे संबंधित लोकांना वापरासाठी दिलेल्या 18 खोल्या सील करण्यात आल्या आहेत.

मुंबई : अंधेरी पश्चिममधील शहाजीराजे क्रीडा संकुलन प्रशासनाकडून एक निर्णय घेण्यात आला आहे. या क्रीडा संकुलनातील हॉस्टेलच्या खोल्यांचे भाडे, वीज आणि पाणी बिलाचे पैसे थकवल्यामुळे संबंधित लोकांना वापरासाठी दिलेल्या 18 खोल्या सील करण्यात आल्या आहेत. त्यांनतर आता संबंधितांकडून सर्व थकीत भाडे, वीज आणि पाणी बील यांची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (18 rooms in hostel in andheri sports complex.)

हेही वाचा : Maharashtra EVM Issue : महाराष्ट्रातील ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची आकडेवारी जुळली; निवडणूक आयोगाचे म्हणणे काय

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान प्रशासनाने त्यांच्या अंधेरी पश्चिम येथील शहाजीराजे क्रीडा संकुलनातील 22 खोल्या या युनायटेड मार्केटींग अँड रिसर्च ब्युरो या संस्थेला ठरलेल्या भाडे कराराने वापरण्यासाठी दिल्या आहेत. मात्र या संस्थेने भाडे करारानुसार देय असलेले भाडे, पाणी आणि वीज बील थकवले आहे. त्याबाबत प्रशासनाने संबंधित कंपनीला वारंवार सांगून देखील त्यांचे काहीच उत्तर नाही. त्यामुळे प्रतिष्ठानच्यावतीने 9 डिसेंबर 2024 रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस अंधेरी पश्चिममधील शहाजीराजे क्रीडा संकुलनात चिटकविण्यात आली आहे. मात्र त्याकडे सदर संस्थेने कानाडोळा केल्याने अखेर शहाजीराजे क्रीडा संकुलन प्रशासनाकडून 22 पैकी 18 खोल्या सील करण्याची कार्यवाही  करण्यात आली आहे.

हेही वाचा : Mumbai Accident : भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवले; 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती

- Advertisement -

तसेच या प्रतिष्ठानचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला असून या ठिकाणी हॉस्टेलमध्ये 22 खोल्या असून त्यातील 18 खोल्या सील करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रतिष्ठानच्या दप्तरी नोंद असलेल्या युनायटेड मार्केटिंग कंपनीने या खोल्यांचे भाडे आणि वीजेच्या बिलासह अन्य रक्कम न भरल्याने या वर्गखोल्या रिकाम्या करून घेण्याच्या दृष्टीकोनात या खोल्या सील करण्यात आल्या आहे. उर्वरीत खोल्यांमधील कुणी नसल्याने त्यांची सील करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसली तरी दुसऱ्यादिवशी ही कारवाई केली जाईल, असे देखील गोडसे यांनी स्पष्ट केले आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -