घरमहाराष्ट्रAnganewadi Yatra : आंगणेवाडी यात्रेला सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक मंत्री लावणार...

Anganewadi Yatra : आंगणेवाडी यात्रेला सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक मंत्री लावणार हजेरी

Subscribe

सिंधुदुर्ग – कोकणातील पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रेला आजपासून (2 मार्च) सुरुवात होत आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीच्या यात्रेला दरवर्षी चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी येतात. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत आंगणेवाडी यात्रेत सहभागी होणार आहेत.

काय आहे यात्रेची परंपरा

मसुरे गाव येथील आंगणेवाडी या वाडीतील आंगणे कुटुंबीयांची श्री भराडी देवी आहे. ‘आंगणे कुटुंबीयांची खासगी देवी’ असा फलकही या मंदिरावर लावण्यात आलेला आहे. असा फलक असला तरी देवीचे दर्शन सर्वांसाठी खुले आहे. कोकणातील भाविकांची देवीवर श्रद्धा आहे, आंगणे कुटुंबीयांचे मंदिर असले तरी ते आता संपूर्ण कोकणाचे झाले आहे. भाविक येथे नवस बोलतात, तो पूर्ण होत असल्याची त्यांची श्रद्धा आहे.

- Advertisement -

यात्रेची तारखेला देवीचा कौल

श्री भराडी देवी यात्रेची तारीख ही देवीचा कौल घेऊन ठरवली जाते. भराडी देवीच्या नावाचीही अख्यायिका आहे. भराडावर म्हणजेच माळरानावर देवी साक्षात प्रकट झाल्याचे मानले जाते, त्यामुळे या देवीला श्री भराडी देवी हे नाव पडलेले आहे. आंगणेवाडीची जत्रा आता कोकणवासीयांची जत्रा झाली आहे. मुंबईतील चाकरमानीही या यात्रेसाठी नित्यनेमाने येत असतात.
यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आंगणेवाडीत ही यात्रा भरते. दक्षिण कोकणची काशी म्हणून आता या यात्रेला प्रसिद्धी मिळाली आहे. राज्यासह देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने यात्रेसाठी कोकणात येतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. दिवसेंदिवस यात वाढ होत चालली आहे. यानिमित्ताने येथे आता राजकीय व्यक्तींचीही हजेरी वाढत आहे. आंगणेवाडी यात्रे निमित्ताने कोकणातील लोकांशी संवाद साधण्याची संधी राजकीय नेत्यांना मिळते.

- Advertisement -

हेही वाचा : Ramdas Kadam : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून भाजपा-शिवसेनेत रस्सीखेच; रामदास कदमांची भाजपावर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -