आंगणेवाडी, कुणकेश्वर जत्रोत्सवाबाबत कुणीही आरोप- प्रत्यारोप करुन गैरसमज पसरवू नये, पालकमंत्र्यांचे आवाहन

Anganwadi, Kunkeshwar Jatrotsav Do not spread illusions by making any allegations Appeal of Guardian Minister uday samant
आंगणेवाडी, कुणकेश्वर जत्रोत्सवाबाबत कुणीही आरोप- प्रत्यारोप करुन गैरसमज पसरवू नये, पालकमंत्र्यांचे आवाहन

आंगणेवाडी श्री देवी भराड़ी माता व कुणकेश्वर यात्रोत्सवाबाबत कुणीही आरोप प्रत्यारोप करून गैरसमज पसरवू नये, या जत्रोत्सवांना प्रशासनाकडून पूर्णपणे सहकार्य राहणार आहे. तशा सूचनाही देण्यात आल्या असून आमदार वैभव नाईक यांनी मालवणमध्ये आढावा बैठकही घेतली आहे अशी माहीती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषद घेत दिली.

पालकमंत्री सामंत यावेळी बोलताना म्हणाले की, गिर्ये येथील रामेश्वरच्या जत्रोत्सवासाठी कोव्हिडचे कोणतेच नियम लावलेले नाहीत कारण तिथे सहा सात दिवस जत्रा चालते त्यामुळे तशी गर्दीही नसते असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. मात्र आंगणेवाडी जत्रोत्सवाला मोठी गर्दी होत असल्याने त्याठिकाणी कोव्हिडचे नियम पाळून एकावेळी फक्त 50 जणांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे, त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवू नये दोन्ही जत्रोत्सवात प्रशासन पूर्ण सहकार्य करणार आहे.

जिल्हा नियोजनामधून रखडलेल्या विकास कामाच्या याद्या लवकरच मंजूर करून 31 मार्चपर्यंत शंभर टक्के निधी खर्च केला जाईल असे सांगितले तर जगातील 30 पर्यटन स्थळाच्या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश झाला आहे ही अभिमानस्पद बाब असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकांचे श्रेय आहे आता पर्यटनमध्ये पहिल्या नंबरवर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलताना केले.


Nawab Malik Arrested : काही सुपरहिरो टोपी घालत नाहीत, म्हणून त्यांना…; वडिलांच्या समर्थनार्थ निलोफर खानचे ट्विट