घरताज्या घडामोडीअंगणवाडी सेविका भडकल्या, राज्यभरात पेटले 'मोबाईल परत' आंदोलन

अंगणवाडी सेविका भडकल्या, राज्यभरात पेटले ‘मोबाईल परत’ आंदोलन

Subscribe

मागण्यांसाठी संघटित पाऊल, नगर, वाशिम, अमरावती व यवतमाळमधून २० हजार मोबाईल शासनाच्या हवाली

नाशिकरोड – शासनाच्या वतीने राज्यातील अंगणवाडी सेविकांना शासकीय कामकाजासाठी दिलेल्या सदोष मोबाईलमुळे त्रस्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी राज्यभर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ‘मोबाईल परत’ आंदोलन केले. राज्यातील अहमदनगर, वाशिम, अमरावती, यवतमाळ या चार जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात हजारो अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाईल शासनाच्या हवाली केले आहेत. काही तालुक्यात अधिकाऱ्यांनी मोबाईल स्विकारण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या कार्यालयात मोबाईल ठेवून देत आंदोलन करण्यात आले.

शासनाने पोषण आहार व इतर कामांसाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल सदोष व वारंवार बिघाड होत असल्याने कमी मानधन असलेल्या अंगणवाडी सेविकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्याच प्रमाणे नव्याने पोषण ट्रॅकर अॅपमध्ये माहिती भरण्यास पर्यायच नसल्याने कामात प्रचंड अडचणी येत असल्याने कामकाजात त्रुटी राहत आहेत. यामुळे अधिकारी अंगणवाडी सेविकांवर दबाव व कारवाईचा धाक दाखवतात. यामुळे त्रस्त अंगणवाडी सेविकांनी राज्यभरातून मोबाईल परत आंदोलन सुरू केले.

- Advertisement -

मंगळवारी (दि.१७) अहमदनगर, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांतील तालुक्याच्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी ‘मोबाईल परत’ आंदोलन केले. यावेळी अनेक ठिकाणी अधिका-यांनी मोबाईल स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला. मंगळवारी झालेल्या आंदोलनात चार जिल्ह्यातील सुमारे २० हजार अंगणवाडी सेविकांंनी शासनाचे मोबाईल परत केले आहे.

दर्जेदार काम हवे असेल तर दर्जेदार मोबाईल द्यावेत. शासनाचे पोषण ट्रॅकर अॅप सदोष आहे. तुटपुंज्या मानधनावर आम्ही काम करतो. कारवाईचा धाक दाखवून वेठीस धरू नये. नव्याने मोबाईल देताना कामकाजात अडथळा येणार नाही असे अॅप द्यावे.  – राजेश सिंग, राज्य संघटक

यवतमाळ जिल्ह्यातून १५ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केले. एका तालुक्यात किमान दीडशे ते दोनशे अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यातून सुमारे साडेतीन हजार मोबाईल परत केले आहेत. मोबाईल दुरुस्तीसाठी माय-बहिणींचे आर्थिक नुकसान झाले. आम्ही खूप त्रस्त झाल्याने आंदोलन करणे हाच एकमेव पर्याय होता. – विजया सांगळे, जिल्हाध्यक्ष, यवतमाळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -