घरमहाराष्ट्रअंगणवाडीतील सेविकांना मिळणार स्मार्टफोन!

अंगणवाडीतील सेविकांना मिळणार स्मार्टफोन!

Subscribe

पोषण अभियान अंतर्गत सेविकांना स्मार्टफोन दिले जाणार आहेत.

अंगणवाडीतील सेविकाना स्मार्टफोन देण्याचा निर्णयाची शासनाकडून सुरुवात करण्याता आली आहे. यात अंगणवाडीतील सेविका, मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांना स्मार्टफोन मिळणार आहेत. ठाणे जिल्ह्यात मंगळवारी तीन हजार ६९५ सेविकाला स्मार्टफोन वाटप करण्यात आले आहेत. लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने अंगणवाडीतील सेविका कार्यरत असतात. अंगणवाडीतील सेविकांना त्यांचा कामाचा लेखाजोखा रजिस्टरमध्ये लिहून ठेवावा लागत असे. यामुळे या महिलांनापोषण अभियान अंतर्गत स्मार्टफोन दिले जाणार आहेत. सर्व आंगणवाडी केंद्रातील सेविका आणि पर्यवेक्षिकांना स्मार्टफोन मिळणार आहेत.

या अंगणवाडी केंद्रात बालकांना पोषण आहार दिला जातो. तसेच अंगणवाडी येणाऱ्या मुलांचे वजन, उंची, त्यांना मिळणारा सकस आहार याकडे लक्ष दिले जाते. या सर्व कामांचा लेखाजोखा सेविकांना ११ प्रकारच्या विविध रजिस्टरमध्ये लिहून ठेवावा लागत होता. मात्र आता सेविकांना देण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये कॉमन अ‍ॅल्पिकेशन सॉफ्टवेअर हा अ‍ॅप तयार करण्यात आला आहे. या अ‍ॅपद्वारे सर्व नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडीतील रजिस्टर नोंदी संपुष्टात येऊन अंगणवाडीताईंचा कामाचा ताणही कमी होणार आहे. पोषण अभियानअंतर्गत (आयसीटी-आरटीएम) या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना स्मार्टफोन दिले जाणार आहेत. त्यामुळे आता अंगणवाडी स्तरावरील लाभार्थींच्या नोंदी पूर्णत: डिजिटल स्वरूपात करणारा महिला आणि बाल विकास हा पहिला विभाग ठरला आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात मिळून तीन हजार ६९५ आणि १३७ पर्यवेक्षिकांना स्मार्ट फोनचे वाटप करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने स्मार्टफोन वाटण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -