घरताज्या घडामोडीसैन्यातील अग्निपथ योजनेवर तरुणांचा संताप, सैन्य भरतीच्या नियमांना विरोध

सैन्यातील अग्निपथ योजनेवर तरुणांचा संताप, सैन्य भरतीच्या नियमांना विरोध

Subscribe

तरुणांनी घोषणाबीज करुन रेल्वे ट्रॅकवर ठाण मांडले. या राड्यामुळे जन शताब्दी एक्सप्रेस एक तास जागेवर उभी होती. पाटलीपुत्र एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

सैन्यातील भरतीसाठी केंद्रातील मोदी सरकारने अग्निपथ नावाची योजना आणली आहे. या योजनेवरुन देशातील वातावरण चांगलेच तापलं आहे. अग्निपथ योजनेविरोधात बक्सरमध्ये तरुणांनी ट्रेनवर दगडफेक करुन रेल्वे रोखल्या आहेत. तर मुजफ्परपुरमध्ये रस्त्यावर तरुण उतरले असल्याची माहिती समोर आली आहे. सैन्यातील खर्च कमी करण्यासाठी आणि तरुणांना सैन्यसेवा करण्याची संधी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून अग्निपथ योजना आणली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी अग्निपथ योजनेची घोषणा केली.

संरक्षण विभागात अग्निपथ योजनेतून सैन्य भरती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु या योजनेच्या घोषणेनंतर वातवारण तापलं आहे. अनेक राज्यामध्ये तरुण रस्त्यावर उतरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ९ वाजताच्या सुमारास बक्सर रेल्वे स्टेशनवर तरुणांचा जमाव दाखल झाला. या तरुणांनी हंगामा केला असून त्यांनी घोषणाबाजी केली. तरुणांनी घोषणाबीज करुन रेल्वे ट्रॅकवर ठाण मांडले. या राड्यामुळे जन शताब्दी एक्सप्रेस एक तास जागेवर उभी होती. पाटलीपुत्र एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

नवीन योजनेवर प्रश्नचिन्ह

चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर २५ टक्के अग्निवीर कायमस्वरूपी स्थायी कॅडरमध्ये दाखल होणार असले तरी दहावी-बारावी उत्तीर्ण होऊन अग्निवीर होणाऱ्या ७५ टक्के तरुणांना पर्याय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकार त्यांना सुमारे १२ लाख रुपयांचा सेवानिधी देणार असले तरी त्यांना दुसरी नोकरी मिळवून देण्यासाठी सरकारकडे कोणती योजना आहे? असा प्रश्न करण्यात येत आहे.

सैन्यात भरती फक्त चार वर्षांसाठी असेल.

1. सैन्यात भरती फक्त चार वर्षांसाठी असेल.

- Advertisement -

2. चार वर्षांसाठी सेवेत घेतलेल्या जवानांचे नाव अग्निवीर असेल.

3. चार वर्षानंतर सैनिकांच्या सेवांचा आढावा घेतला जाईल. पुनरावलोकनानंतर, काही सैनिकांच्या सेवा वाढवल्या जाऊ शकतात. बाकीचे निवृत्त होतील.

4. चार वर्षांच्या नोकरीमध्ये सहा-नऊ महिन्यांचे प्रशिक्षण देखील समाविष्ट असेल.

5. निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नाही, पण एकरकमी रक्कम दिली जाईल.

6. विशेष बाब म्हणजे आता लष्कराच्या रेजिमेंटमध्ये जात, धर्म आणि प्रदेशानुसार भरती होणार नाही, तर ती देशवासी म्हणून असेल. म्हणजेच कोणत्याही जाती, धर्म आणि प्रदेशातील तरुण कोणत्याही रेजिमेंटसाठी अर्ज करू शकतात.

7. योजनेला लवकरच हिरवा सिग्नल मिळाल्यास, या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात होईल आणि सैन्यात (लष्कर, नौदल आणि हवाई दल) भरती सुरू होईल.


हेही वाचा : गृहिणींना मोठा धक्का! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ७५० रुपयांची वाढ

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -