घरताज्या घडामोडीहिंगणघाट प्रकरण : ग्रामस्थांचा आक्रोश; रुग्णवाहिका, पोलिसांवर दगडफेक!

हिंगणघाट प्रकरण : ग्रामस्थांचा आक्रोश; रुग्णवाहिका, पोलिसांवर दगडफेक!

Subscribe

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेच पार्थिव गावात आल्यावर ग्रामस्थांनी एकच आक्रोश करत रुग्णवाहिकेवर दगडफेक करत निषेध व्यक्त केला.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडितीचा आज पहाटे उपचारानंतर मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. तर पीडितीच्या दारोडा या गावावर शोककळा पसरली असून गावातील सर्व दुकाने बंद आणि घरे बंद करण्यात करण्यात आली होती. तर काही गावकऱ्यांनी गावातील चौकात येऊन घटनेचा निषेधही नोंदवला. त्यामुळे कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये म्हणून गावात ३०० पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी पार्थिव गावात येऊ नये, म्हणून रास्ता रोखो केला होता. रस्त्यावर लाकूड आडवे ठेवण्यात आले होते. तसेच जमलेल्या समुदयांनी पोलिसांच्या दिशेने तसेच रुग्णवाहिकेच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी देखील गावकऱ्यांवर लाठीचार्ज करत जमावाला पांगवले.

गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पार्थिव घेतले ताब्यात

‘हिंगणघाट घटनेतील युवतीचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात निकाल लवकर लावला जाईल. तसेच पीडितीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरीही दिली जाईल’, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडितेच्या कुटुंबियांना दिले. त्यानंतर पीडितीच्या कुटुंबियाने पार्थिव ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

काय आहे हिंगणघाट प्रकरण

हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे यांने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे याने तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरूणीने आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते.


हेही वाचा – पीडितेच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी – अनिल देशमुख

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -