Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी 'आपण हा तमाशा पाहत बसायचा का?' मुळशी आग दुर्घटनेनंतर अभिनेता प्रविण तरडेच्या...

‘आपण हा तमाशा पाहत बसायचा का?’ मुळशी आग दुर्घटनेनंतर अभिनेता प्रविण तरडेच्या संतप्त प्रतिक्रिया

दहा ठिकाणी मुळशी तालुक्याची रग माहिती आहे तिच रग आता आपल्या आई बापासाठी दाखवा.

Related Story

- Advertisement -

पुण्यातील मुळशी तालुक्यातील सॅनिटायझर कंपनीला आग लागल्याची दुर्देवी घटना सोमवारी घडली. या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची घटनास्थळी जाऊन अभिनेता, लेखक प्रविण तरडे यांनी पाहणी केली. तिथली परिस्थिती पाहून प्रविण तरडेंच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. (Angry reaction of actor Pravin Tarde after the Mulshi fire accident pune)  ‘४० बाय ४० च्या जागेत ३८ माणसे काम करतात का कधी? आपली आई,बहिण,भाऊ,नवरा,बायको ज्या कंपनीत कामाला आहे त्यांना हात जोडून विनंती करा की आम्हाला तुमची कंपनी पाहुद्यात. प्रत्येकाने कंपनी आतमध्ये जाऊन पाहिली पाहिजे. मुळशीतील प्रत्येक सरपंच आणि उपसरपंचाला मी विनंती करतो कंपन्यांच्या आत जा आणि आपले भाऊबंध कसे काम करतात ते पहा. नाहीतर तेही महिन्याभारानी,वर्षांनी जळून मरतील आणि आपण हा तमाशा पाहत बसायचा का?’, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रविण तरडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रविण तरडे पुढे असेही म्हणाले आहेत की, तक्रार कोणाची ही नाही. पण सध्याच्या परिस्थितीत प्रशासनावर अवलंबून राहू नका. जिथे आपले नातेवाईक काम करतात तिथे जाऊन ते कसे काम करतात हे पाहणे आता आपली जबाबदारी आहे. मी पोरांना विनंती करतो की दहा ठिकाणी मुळशी तालुक्याची रग माहिती आहे तिच रग आता आपल्या आई बापासाठी दाखवा. कंपन्यांच्या आत जाऊन पाहा. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांमध्ये इथल्या मालकांना घेऊन जा आणि त्यांना दाखवा तिथले लोक कसे काम करतात, असे प्रविण तरडे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ज्या कंपनीला आग लागली त्याच्या बाजूच्या प्राज इंडस्ट्रीजमध्ये मी तीन वर्षे कामाला होतो,असेही प्रविण तरडे यांनी सांगितले. त्या कंपन्यांचे फॅक्ट्री लेआउट फार चांगले आहे. मग त्यांच्या बाजूच्या कंपन्यांची अशी अवस्था का? ४० बाय ४० च्या खोलीत ३८ माणसे काम करतात का कधी? एवढ्याशा जागेत १० ते १२ केमिकल मशीन्स आणि ३८ माणसे कामाला. त्यातील जी २० माणसे वाचली त्यांचा आनंद मानायचा कि दुर्दैव असा प्रश्न प्रविण तरडे यांनी उपस्थित केला.


हेही वाचा – ‘सीतेच्या’भूमिकेसाठी करीनाने मागितले तब्बल12कोटी रुपये!निर्मात्याला फुटला घाम

- Advertisement -

 

 

 

- Advertisement -