धैर्यशील मानेंचा ताफा अडवत संतप्त शिवसैनिकांनी ‘गद्दार’वरून विचारला जाब

मुंबई : शिवसेनेशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गद्दारी करत शिंदे गट बाहेर पडल्यापासून उद्धव ठाकरेंशी प्रामाणिक असलेले शिवसैनिक शिंदे गटावर कमालीचे नाराज असल्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (dhairyashil mane) एका कार्यक्रमानिमित्त आज चंदूर येथे जात असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवत, पक्षाशी गद्दारी का केली? असा जाब विचारला.

चंदूर येथे बुधवारी सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. गद्दारीमुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने (dhairyashil mane) यांना जाब विचारल्याने वातावरण चांगलेच तापल्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. परिस्थिती आणखी चिघळेल असे वाटत असताना पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना बाजूला करत खासदार धैर्यशील माने यांच्या गाडीला रस्ता मोकळा करून दिला.

हेही वाचा- महाविकास आघाडीची पहिली एकत्रित सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये

धैर्यशील माने (dhairyashil mane) यांनी शिवसैनिकांशी आणि निवडणुकीचे तिकीट दिलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी गद्दारी करत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात धैर्यशील माने यांना अडवून जाब विचारण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यात अशाच पद्धतीने सर्व शिंदे गटातील गद्दारांना जाब विचारण्यात येईल, असेही चंदूरचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सांगितले.

बच्चू कडूंनाही शेतकऱ्यांने विचारला जाब
शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेसोबत 40 आमदार बाहेर पडले. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूंची (bacchu kadu) साथ देखील शिंदेंना मिळाली. मात्र याच मुद्द्यावरून एका शेतकऱ्याने बच्चू कडूंना १ मार्चला अडवलं आणि ‘तुम्ही गद्दारी का केली?’ असा सवाल केला होता. बच्चू कडू यांनी नुकताच धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी एका वृद्ध शेतकऱ्यांने गर्दीत घुसून बच्चू कडू यांना जाब विचारला होता.

हेही वाचा- हक्कभंगाच्या नोटिशीला अखेर संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले…