घरताज्या घडामोडीकोकणी तरूणाची अनोखी शक्कल, गॅरेजमध्ये थाटलं हॉटेल

कोकणी तरूणाची अनोखी शक्कल, गॅरेजमध्ये थाटलं हॉटेल

Subscribe

एनएच ६६ फुड गॅरेजमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी गाड्यांमधील सीट आणि रॉकेलसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅरलचं रुपांतर खुर्चीत करण्यात आलंय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघदे गावातील एका छोट्याशा हॉटेलनं पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे. तरुणाने टाकाऊपासून टिकाऊ अशा विचाराने एक गॅरेज हॉटेलची निर्मिती केली आहे. आता हेच हॉटेल पर्यटकांना चांगलंच आकर्षित करत आहे. गॅरेजमध्ये गाड्यांच्या अवशेषांचा वापर करुन बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चारचाकी आणि दुचाकीची केलेली आसनव्यवस्था ग्राहकांना प्रचंड आवडली असून ग्राहक पुन्हा पुन्हा या हॉटेलला भेट देत आहेत. कणकवलीतील तरुणाने ही हटके थीम शोधून गॅरेजमध्येच हॉटेल उभारलं आहे. या हटके थीममुळे हॉटेल पर्यटकांचे आकर्षण बिंदू ठरत आहे.

राज्यात किंवा देशभरातील अनेक हटके हॉटेल्स तुम्ही पाहिले असतील. मात्र कोकणातील एका तरुणाने टाकाऊपासून टिकाऊ असा विचार करुन गॅरेजमध्येच हॉटेल तयार केलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावरचं गॅरेज पर्यटकांचे आकर्षण ठरतंय, या गॅरेजमध्ये गाड्या नाहीत किंवा अस्वच्छताही नाही. तर या गॅरेजमध्ये पदार्थांचा खमंग असा वास आहे. एनएच ६६ फुड गॅरेज असं या हॉटेलचं नाव आहे.

- Advertisement -

एनएच ६६ फुड गॅरेजमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी गाड्यांमधील सीट आणि रॉकेलसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅरलचं रुपांतर खुर्चीत करण्यात आलंय तर चेतक स्कुटरचा वापर डायनिंग टेबलसाठी करण्यात आला आहे. इथलं कॅश काऊंटरही टमटमच्या रुपात केलं आहे. अनिकेत गुरव यांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी गॅरेजचं हॉटेलच केलं. अनिकेत गुरव यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. स्वतःच हॉटेल उभं करायचे होते तर काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्यांना ही कल्पना सुचली. आपल्या जिल्ह्यात नाही असं हॉटेल तयार करायचं असा ध्यास त्यांनी घेतला होता.

हॉटेलमधील प्रत्येक गोष्ट पर्यटकांना भुरळ घालत आहे. वॉश बेसिनमधील टायरचा वापर किंवा भींतीवर तयार करण्यात आलेलं चित्र आणि सजावटीसाठी वापरण्यात आलेले गाड्यांचे अवशेष यामुळे ग्राहक आकर्षित होत आहेत. वॉश बेसीनमध्ये नळाच्या ऐवजी पेट्रोल हँडलचा वापर करण्यात आला आहे. चारचाकी आणि दुचाकीचे डायनिंग टेबलवर ग्राहक बसण्यास पसंती दर्शवतात या टेबलवर बसण्यासाठी ग्राहक वाटही पाहत असतात. अशी माहिती हॉटेलचे मालक अनिकेत गुरव यांनी दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -