घरताज्या घडामोडीशिवसेनेचे सर्व खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, अनिल देसाईंकडून चर्चांवर स्पष्टीकरण

शिवसेनेचे सर्व खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, अनिल देसाईंकडून चर्चांवर स्पष्टीकरण

Subscribe

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतील. तसेच शिवसेनेतील सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत असे अनिल देसाई म्हणाले.

शिवसेनेते अनेक खासदार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु शिवसेनेचे खासदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे राज्यसभा खासदार अनिल देसाई म्हणाले. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या मार्फत कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. मूळ शिवसेनेला बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या बैठकीत ७ खासदार अनुपस्थित होते. नाराज खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत अशी चर्चा सुरु आहे. तसेच भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा अशी मागणी अनेक खासदारांची आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतील. तसेच शिवसेनेतील सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत असे अनिल देसाई म्हणाले. खासदारांच्या बैठकीमध्ये अनिल देसाई प्रत्यक्ष उपस्थित नव्हते परंतु दिल्लीमधून व्हिसीद्वारे उपस्थित होते.

- Advertisement -

खासदार अनिल देसाई यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेकडून कॅव्हेट दाखल करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. निवडणूक आय़ोगाकडे कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. आमदार सुभाष देसाई यांच्या मार्फत कॅव्हेट दाखल करण्यात आली असून मूळ शिवसेनेला पहिली बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून जर धनुष्यबाण चिन्हासाठी दावा करण्यात आला तर शिवसेनेची बाजू न ऐकता निर्णय घेऊ नये असे सेनेच्या कॅव्हेटमध्ये म्हटलं आहे.

शिंदे गटाकडून अद्याप धनुष्यबाण चिन्हावर दावा नाही

शिवसेनेत संघर्ष सुरु आहे. दरम्यान शिंदे गटाने अद्याप शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हावर दावा केला नाही. असे असतानाही शिवसेनेकडून कॅव्हेट याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून अद्याप कोणताही दावा करण्यात आला नाही असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत असे दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शिवसेनेचे खासदारही वेगळ्या मार्गाच्या विचारात, ठाकरेंच्या बैठकीला फक्त 12 खासदार उपस्थित, 7 गैरहजर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -