घरताज्या घडामोडी'या' निर्णयाच्या बाबतीत फेरविचार केला जाईल, अनिल देशमुखांचं मोठं वक्तव्य

‘या’ निर्णयाच्या बाबतीत फेरविचार केला जाईल, अनिल देशमुखांचं मोठं वक्तव्य

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज ‘लोक माझे सांगाती… राजकीय आत्मकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. पण यावेळी शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी एकच गोंधळ घालत पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील यावेळी अश्रू अनावर झाले तर जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील या सर्वांनी शरद पवार यांची मनधरणी करण्यास सुरूवात केली. दरम्यान, ‘या’ निर्णयाच्या बाबतीत फेरविचार केला जाईल, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केलं आहे.

अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी एकच गोंधळ घालत पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहिले पाहिजेत, असा सर्व नेत्यांचा आग्रह शरद पवारांना आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.

- Advertisement -

सातत्याने आम्ही सुद्धा आग्रह करत आहोत. शरद पवारांची गरज फक्त पक्षालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला आहे. त्यामुळे त्यांनीच अध्यक्षपदाची धुरा सांभाळत महाराष्ट्र आणि देशाच्या विकास कामांकडे लक्ष द्यावं, अशा पद्धतीची सर्व नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु शरद पवारांनीच पक्षाच्या अध्यक्षपदी राहावं, असं अनिल देशमुख म्हणाले.

शरद पवारांनीच अध्यक्षपदी राहावं, अशी विनंती आणि आग्रह अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासहित सर्वच नेत्यांनी केला. परंतु या निर्णयाच्या बाबतीत फेरविचार केला जाईल, असंही अनिल देशमुख म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -