घरक्राइमAnil Deshmukh Case : अनिल परबांच्या खात्याशी संबंधित आरटीओ अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचा...

Anil Deshmukh Case : अनिल परबांच्या खात्याशी संबंधित आरटीओ अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचा छापा

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने सोमवारी आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावर छापा टाकला. बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब मंत्री असलेल्या आरटीओ विभागात कार्यरत आहेत. खरमाटे यांच्यावर आरटीओ विभागातील बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तक्रार पत्रात परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कोट्यवधींची वसुली केल्याचा आरोप केला आहे. पाटील यांच्या तक्रारीनुसार, अनिल परब यांच्या सांगण्यावरून आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगसाठी कोट्यवधी रुपयांची मोठी रक्कम गोळा करण्यात आली. अशा प्रकारे २५० ते ३०० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तक्रार १५ मे रोजी देण्यात आली होती, ज्यात असे म्हटले आहे की या रॅकेटचा मास्टरमाईंड वर्धा येथे तैनात डेप्युटी आरटीओ बजरंग खरमाटे आहे.

- Advertisement -

ईडीकडून भावना गवळींच्या ५ ठिकाणांवर धाडी

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची माहिती समोर येत आहे. अधिक माहितीनुसार, शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. याची दखल घेतात ईडीने भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम इथं असलेल्या पाच संस्थांवर धाडी टाकल्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -