घरमहाराष्ट्रचौकशीला दांडी मारणाऱ्या परमबीर यांना आयोगाकडून शेवटची संधी, ७ सप्टेंबरला गैरहजर राहिल्यास...

चौकशीला दांडी मारणाऱ्या परमबीर यांना आयोगाकडून शेवटची संधी, ७ सप्टेंबरला गैरहजर राहिल्यास वॉरंट जारी

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांची चौकशी चांदिवाल समिती करत आहे. मात्र, परमबीर सिंह चौकशी आयोगासमोर सातत्यानं गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे आयोगानं सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय, आयोगाने परमबीर सिंह ७ सप्टेंबरला गैरहजर राहिले तर त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केलं जाईल अशी तंबी दिली आहे.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुल करण्याचे आदेश दिल्याचे आरोप केले. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. यानंतर राज्य सरकारने देखील या आरोपांची समांतर चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगामार्फत सुरु केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या आयोगानं परमबीर यांना आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, परमबीर यांनी प्रतिज्ञापत्र सादर न करता चौकशीला सातत्याने गैरहजर राहिले आहेत. यामुळे आयोगाने परमबीर यांना जून महिन्यात ५ हजारांचा, १९ ऑगस्टला २५ हजाराचा आणि २५ ऑगस्टला पुन्हा २५ हजाराचा दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे निर्देश देत ३० ऑगस्टला सुनावणी निश्‍चित केली होती. मात्र या सुनावणीलाही परमबीर सिंह गैरहजर राहिल्यानं आयोगानं संताप व्यक्त केला. तसंच पुढील सुनावणीला परमबीर सिंह जर गैरहजर राहिल्यास वॉरंट जारी केला जाईल, अशी तंबी देत आयोगाने सुनावणी ७ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -