Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अशा धाडींचा राजकीय उद्दिष्टांसाठी आणि राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर - जयंत...

अशा धाडींचा राजकीय उद्दिष्टांसाठी आणि राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर – जयंत पाटील

अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप करतानाच या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली आणि चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही असेही जयंत पाटील म्हणाले. अँटेलिया आणि हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -