घरताज्या घडामोडीअनिल देशमुखांनी ED ला केले विनंतीचे ट्विट

अनिल देशमुखांनी ED ला केले विनंतीचे ट्विट

Subscribe

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांनी परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर अंमलबजावणी संचलनालय (ED) मार्फतची चौकशी सध्या सुरू आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांनी स्वतःच खुलासा केला आहे. ईडीने मला कागदपत्रांसह उपस्थित रहावे असे दोन समन्स पाठविले आहे. मी ईडीला दोन सविस्तर पत्रे पाठवून मला ECIR ची कॉपी द्यावी आणि त्यांना जी कागदपत्रे हवी आहे याची यादी द्यावी अशी विनंती केली आहे. या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ही यादी मला ईडीला पाठवता येईल असे अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर इतर बाबींचा सविस्तर उल्लेख मी माझ्या ईडीला दिलेल्या दोन्ही पत्रांत केला आहे. मी ईडीला यापूर्वीही सहकार्य केले आहे. यापुढेही असेच सहकार्य करत राहील असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. याआधीच ईडीमार्फत दोन वेळा अनिल देशमुख यांना समन्स पाठविण्यात आला होता. या समन्सला अनिल देशमुख यांच्या वकिलांमार्फत उत्तर देण्यात आले होते. त्यावेळी अनिल देशमुखांकडून एक आठवड्याचा वेळ हा ईडीच्या चौकशीसमोर हजर राहण्यासाठी मागण्यात आला होता. त्यानंतर आज शुक्रवारी अनिल देशमुख यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती जाहीर केली आहे. त्यामध्ये अनिल देशमुख यांनी ECIR च्या कॉपीचा उल्लेख केला आहे. तसेच आपण ईडीच्या तपासासाठी संपुर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या कुंदन शिंदे आणि खासगी सहाय्यक संजीव पालांडे यांना ED ने २६ जून रोजी PMLA कायद्याखाली अटक केली होती. ईडीच्या मागणीनंतर या दोघांनाही पुन्हा ६ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरूवारी त्यांना दुसऱ्यांदा पीएमएल कोर्यात रिमांड करिता आणण्यात आला आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -