घरताज्या घडामोडीरोज ९ तास चौकशी अन् २०० प्रश्न, देशमुखांचा ED कोठडीतला मुक्काम वाढला

रोज ९ तास चौकशी अन् २०० प्रश्न, देशमुखांचा ED कोठडीतला मुक्काम वाढला

Subscribe

ईडी कोठडीत माझा मानसिक छळ होत असल्याचा आरोप देशमुखांच्या वतीने करण्यात आला

ईडीनं हेतूत: आपल्याला या संपुर्ण प्रकरणात गोवून अटक केली आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांना अद्याप अटक का केली नाही? मी चौकशीसाठी हजर झालो आणि मला अटक झाली. दिवसाला 8-9 तास चौकशी करून ईडी कोठडीत छळ सुरू आहे. ईडीकडून मानसिकरित्या त्रास दिला जातोय असा देशमुखांच्या वकीलांचा आज पीएमएलए कोर्टात युक्तिवाद झाला. दुसरीकडे ईडीने वाढीव कोठडीसाठी युक्तिवाद करताना म्हटले की, आम्हाला देशमुखांची कस्टडी चौकशीसाठी नकोय, केवळ त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे आहे, असेही सांगण्यात आले. देशमुखांची कोठडी तीन दिवसांनी वाढवण्याचा निर्णय आज विशेष कोर्टाने दिला.

- Advertisement -

देशमुखांच्या वतीने युक्तिवाद करताना सांगण्यात आले की, जर सचिन वाझेचं स्टेटमेंट दुस-या कोठडीत असताना घेता येतं मग देशमुखांचं का नाही?, देशमुखांच्या वकिलांकडून ईडी कस्टडीला विरोध करण्यात आला. किमान दोन दिवसांची तरी कस्टडी द्या असा युक्तिवाद हा ईडीकडून करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांची कोठडी तीन दिवसांनी वाढवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. आगामी १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडी वाढवून देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. विशेष कोर्टाचे न्यायाधीश ए.एस. सतभाई यांनी निर्देश दिले.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या खंडणीच्या आरोपानंतर ईडीकडून अटक करण्यात आलेले अनिल देशमुख यांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले आहे. ईडीने अनिल देशमुखांना आज एक दिवसाची ईडी कोठडी कोर्टाने सुनावली. आम्हाला स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी कोठडी हवी आहे, अशी मागणी ईडीने आज कोर्टासमोर केली होती. अनिल देशमुखांच्यावतीने ईडी कोठडीला विरोध करण्यात आला. पण पीएमएल कोर्टात आज युक्तिवाद झाला. त्यामध्ये १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडी वाढवून देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. विशेष कोर्टाचे न्यायाधीश ए.एस. सतभाई यांनी निर्देश दिले.

- Advertisement -

काय झाला युक्तिवाद ?

ईडीने हेतूत: आपल्याला यात गोवून अटक केली आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांना अद्याप अटक का केली नाही? मी चौकशीसाठी हजर झालो आणि मला अटक झाली. दिवसाला 8-9 तास चौकशी करून ईडी कोठडीत छळ सुरू आहे. त्यांना मानसिकरित्या त्रास दिला जातोय असा देशमुखांच्या वकीलांचा युक्तिवाद सुरू आहे. दुसरीकडे ईडीने युक्तिवाद करताना म्हटले की, आम्हाला देशमुखांची कस्टडी चौकशीसाठी नकोय, केवळ त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे आहे असेही सांगण्यात आले. जर सचिन वाझेचं स्टेटमेंट दुस-या कोठडीत असताना घेता येतं मग देशमुखांचं का नाही?, देशमुखांच्या वकिलांकडून ईडी कस्टडीला विरोध करण्यात आला. किमान दोन दिवसांची तरी कस्टडी द्या असा युक्तिवाद हा ईडीकडून करण्यात आला आहे.

मला २०० प्रश्न विचारले गेले – अनिल देशमुख 

पीएमएल कोर्टात हजर केल्यानंतर अनिल देशमुख यांनी कोर्टाला स्वतः लिहिलेल एक पत्र दिले. ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात काहीही तक्रार नाही. आतापर्यंत २०० हून अधिक प्रश्न विचारल्याचे अनिल देशमुख यांनी कोर्टाला सांगितले. आता माझ्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे आता ईडी कोठडी वाढवून देऊ नका अशी विनंती करताना अनिल देशमुख दिसले. अनिल देशमुख यांच्या वतीने अॅड विक्रम चौधरी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

ईडीने अनिल देशमुखांची आणखी चौकशी करण्याची गरज असल्याचे आजच्या युक्तिवादात म्हटले होते. त्यासाठीच ईडीने आणखी तीन दिवस अनिल देशमुखांची ईडी कस्टडी वाढवून मागितली होती. पण ईडीच्या आणखी कोठडीला विरोध करत अनिल देशमुखांच्या वतीने युक्तिवाद झाला. देशमुखांचे वाढते वय आणि खालावलेल्या तब्येतीचा दाखला हा देशमुखांच्या वकिलांकडून देण्यात आला होता.


Anil Deshmukh ED : सुप्रिया सुळे सत्र न्यायालयात हजर, अनिल देशमुख म्हणाले….

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -