घरताज्या घडामोडीLive Update: ऋषीकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीनावर १२ नोव्हेंबरला सुनावणी

Live Update: ऋषीकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीनावर १२ नोव्हेंबरला सुनावणी

Subscribe

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.


ऋषीकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीनावर १२ नोव्हेंबरला सुनावणी करण्यात येणार आहे. ऋषीकेश देशमुख यांना ईडीने शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते परंतु ऋषीकेश देशमुख हजर राहिले नाही.

- Advertisement -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. , अनिल देशमुख यांना पीएमएलए कोर्टाने कोठडी सुनावली आहे. १०० कोटींची खंडणी गोळा करण्याच्या आरोपाची ईडी चौकशी करत आहे.

अनिल देशमुखांना १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन चौकशी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

आगीच्या घटनेची सखोल चौकशी करा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी


शासकीय रुग्णालयातील आग घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करु- हसन मुश्रीफ

यापुर्वीच्या घटनांवरुन आपण सावध राहायला पाहिजे होते.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. देशमुखांची ईडी कोठडी आज संपणार आहे. परंतु कोर्टाचा अनिल देशमुखांना दिलासा मिळणार का आणखी काही दिवस कोर्टातच मुक्काम वाढणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


शासकीय रुग्णालयाच्या आगीत ५ जणांचा मृत्यू


अहमदनगरमध्ये शासकीय रुग्णालयाला आग लागली आहे. आयसीयूत आग लागली असल्याचे माहिती मिळाली आहे. तसेच या आगीमध्ये ३ ते ४ जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.


मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कार्यालयातून वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात आले आहे.आज देशमुख यांची ईडी कोठडी संपली असून त्याना दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


कॉर्डेलिया क्रूझ प्रकऱणात करण्यात आलेल्या ड्रग्ज कारवाईमागील मास्टरमाईंड हा सुनिल पाटील आहे. सुनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे. किरण गोसावी सुनिल पाटीलचा ओळखीचा आहे.

गोसावीला भाजपचा नेता म्हणून सांगण्यात आले. सॅम डिसूझाने सुनिल पाटीलच्या बोलण्यावर एनसीबी अधिकाऱ्यांची ओळख करुन दिली.

नवाब मलिकांनी भाजपवर खोटे आरोप केले
महाविकास आघाडी सराकरमधील कोणता मंत्री या षडयंत्रामागे आहे?

मोहित कंबोज यांचा आर्यन खान प्रकरणावर खुलासा


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घराचे नाव शीवतीर्थ ठेवण्यात आलं आहे.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे. अनिल देशमुखांना जामीन मिळणार का पुन्हा त्यांच्या कोठडीत वाढ होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि मध्यमहाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. नाशिकमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांना वाट काढत चालावं लागले. तसेच ऐनवेळी पाऊस आल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आगामी २ ते ३ दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


नवाब मलिकांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे वाटतं -चंद्रकांत पाटील

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -