घरमहाराष्ट्रAnil Deshmukh On BJP : सर्वाधिक नाराज आमदार भाजपाचे; अनेक आमच्या संपर्कात - अनिल देशमुख

Anil Deshmukh On BJP : सर्वाधिक नाराज आमदार भाजपाचे; अनेक आमच्या संपर्कात – अनिल देशमुख

Subscribe

अदृश्य शक्तीचा वापर करून हे सर्व करण्यात आले आहे, हे राज्यातील जनेतला देखील माहिती आहे, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

मुंबई : भाजपाचे आमदार सर्वात जास्त नाराज आहे. पुढील काळात अनेक आमदारांची घरवापसी होईल, असा विश्वास माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. अदृश्य शक्तीचा वापर करून हे सर्व करण्यात आले आहे, अशी टीका प्रतिक्रिया अनिल देशमुखांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिली आहे.

पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर पक्षातील आमदारांमध्ये अस्थिरता आहे का? यावर अनिल देशमुख म्हणाले, “पक्षता कुठेही अस्थिरता नाही. सध्या भाजपाच्या आमदारांमध्ये सर्वात जास्त अस्थिरता आहे. कारण भाजपाचे आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले. पण बाहेरून आलेल्या लोक पहिल्या पंगतीत बसवले. त्यामुळे सर्वांत जास्त भाजपाचे आमदार हे नाराज आहे आणि बाकीचे जे आमिष दाखवून भाजपामध्ये आणले होते, ते आमदार देखील नाराज आहेत. अनेक आमदार हे आमच्या संपर्कात आहेत. जस जशा निवडणुका जवळ येतील. यानंतर त्या आमदारांची घरवापसी होईल”, अशा विश्वास अनिल देशमुखांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra NCP Crisis : आता आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देणार?

लोकशाहीचा मुडदा पाडला, त्यांना लोकशाहीने धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर दिली. यावर अनिल देशमुख प्रतिक्रिया दिली की, ” काय, कसे आणि कुठून झाले हे सर्व देवेंद्र फडणवीसांना देखील माहिती आहे. अदृश्य शक्तीचा वापर करून हे सर्व करण्यात आले आहे. हे राज्यातील जनेतला देखील माहिती आहे. शिवसेनेबाबत जे झाले आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत देखील हेच झाले. हे सर्व राज्यातील जनतेला माहिती आहे. ज्यांनी हे सर्व घडविले, त्यांना राज्यातील जनता शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -