Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रAnil Deshmukh : हल्ल्यावेळी नेमके काय घडले? देशमुखांचे स्वीय सहाय्यकांनी सांगितला घटनाक्रम

Anil Deshmukh : हल्ल्यावेळी नेमके काय घडले? देशमुखांचे स्वीय सहाय्यकांनी सांगितला घटनाक्रम

Subscribe

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचे गेल्या 10 वर्षांपासून स्वीय सहाय्यक उज्वल भोयर यांनी हल्ला नेमका कसा झाला आणि त्यावेळी काय घडले. याबाबतचा घटनाक्रम सांगितला आहे.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी (ता. 18 नोव्हेंबर) रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा हल्ला भाजपा कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप स्वतः देशमुख यांनी केलेला आहे. पण भाजपा नेत्यांकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. तसेच, हा एक पॉलिटीकल स्टंट असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अशातच आता अनिल देशमुख यांचे गेल्या 10 वर्षांपासून स्वीय सहाय्यक उज्वल भोयर यांनी हल्ला नेमका कसा झाला आणि त्यावेळी काय घडले. याबाबतचा घटनाक्रम सांगितला आहे. (Anil Deshmukh personal assistant Ujwal Bhoyer narrated sequence of events of the attack)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्वल भोयर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाचे काटोल विधानसभेचे अधिकृत उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचारसभेकरिता अनिल देशमुख हे नरखेड येथे गेले होते. नरखेड येथील सभा संध्याकाळी 05 वाजता संपल्यानंतर देशमुख हे त्यांचे ड्रायव्हर धिरज चंडालीया आणि डॉ. गौरव चर्तुर्वेदी यांच्यासोबत अन्य काही लोकांनी मिळून नरखेड येथील एकदोन घरी भेटी दिल्या. या भेटीनंतर सर्वजण नरखेडवरून तिनखेडा भिष्णुर मार्गे काटोलला जाण्यास निघाले. त्यावेली अनिल देशमुख यांची गाडी पुढे व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दोन गाड्या या मागे होत्या. काटोलला घरी परतत असताना रात्री 8.15 ते 8.30 वाजताच्या दरम्यान बेल फाटा येथे आली. पण हा रस्ता वळणाचा असल्याने या ठिकाणी गाडीची गती कमी झाली. ज्यानंतर त्या वळणावर अचानकपणे चार अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी गाडीवर दगडफेक केली, अशी माहिती भोयर यांनी पोलिसांच्या जबाबात दिली.

- Advertisement -

हेही वाचा… Sharad Pawar : अनिल देशमुख गाडीवर हल्ला प्रकरणी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले…

या घटनेवेळी अनिल देशमुख हे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते. या अज्ञात इसमांपैकी एकाने गाडीच्या समोरील काचेवर दगड फेकला. त्यामुळे काचेला तडा गेला. त्यानंतर अनिल देशमुख हे ज्या बाजूला बसले होते, त्या बाजूने एकाने दगड फेकला आणि त्यानंतर आणखी एकाने बाजूने दगड गाडीवर फेकला. ही दगडफेक सुरू असतानाच ही अज्ञात लोक “भाजपा जिंदाबाद अनिल देशमुख मुर्दाबाद” अशी घोषणा गेत होते. या घटनेनंतर हे चौघेही दोन दुचाकीवर बसून भारसिंगी रोडने पळू गेले. पण या घटनेत अनिल देशमुख यांच्या कपाळाला दुखापत झाली. त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागल्याने आम्ही सर्वजण घाबरलेलो होतो, असेही स्वीय सहाय्यक उज्वल भोयर यांनी पोलिसांना सांगितले.

- Advertisement -

तसेच, या घटनेत जखमी झालेल्या अनिल देशमुख यांना तत्काळ त्यांच्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांच्या गाडीमध्ये बसवण्यात आले. यावेळी काटोलजवळ आल्यानंतर रेल्वे फाटक बंद होते. पण त्याचवेळी अनिल देशमुख यांच्या तीन कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाले. पण आम्ही तिथे न थांबता गाडी त्या ठिकाणाहून काढून काटोल ग्रामीण रुग्णायलयात आलो. या रुग्णालयात अनिल देशमुख यांच्यावर प्राथमिक उपचार करून आणि त्यांची तपासणी करून डॉक्टरांनी देशमुख यांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात पाठवले, असा तोंडी जबाब अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्वल भोयर यांनी काटोल पोलिसांना दिला आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -