घरताज्या घडामोडीपरमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे चौकशीतून सत्य बाहेर येईल, अनिल देशमुख...

परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे चौकशीतून सत्य बाहेर येईल, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

Subscribe

परमबीर सिंह यांना आरोप करायचे होते तर त्यांनी आयुक्त पदी असताना आरोप करायला हवे होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरमधील घरासह ५ ठिकाणी ई़डीने छापेमारी केली आहे. दिवसभर ई़डीची कारवाई सुरु होती. दरम्यान या कारवाईनंतर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीची काही अधिकारी चौकशी साठी आले होते. त्यांना संपुर्ण सहकार्य केले असून पुढील काळातही सहकार्य करु, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. ते आरोप त्यांना पदावरुन हटवल्यानंतर केले होते. जेव्हा ते पोलीस आयुक्त होते तेव्हा त्यांनी आरोप केले नाही. परंतु त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी आरोप केले होते. त्यांना आरोप करायचे होते तर त्यांनी आयुक्त पदी असताना आरोप करायला हवे होते.

उद्दोगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्यात आलं तसेच मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने जे माजी एपीआय सचिन वाझे, रियाझुद्दीन काजी, विनायक शिंदे, प्रकाश, सुनील माने असे ५ जण मुंबई पोलीस आयुक्तालयात सीआयु विभागात कामाला होते आणि परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होते. जेव्हा शासनाला ही गोष्ट माहिती मिळाले हे सर्व या प्रकरणात सहभागी आहेत. यामुळे परमबीर सिंह यांची आयुक्त म्हणून भूमिका संशयित होती. यातील सर्व अधिकारी तुरुंगात आहेत. अशा या संशयास्पद भूमिकेमुळे त्यांची बदली केल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. माझ्यावरील आरोपांवर सीबीआय चौकशी करत आहेत. ज्या तपास यंत्रणांना संपुर्ण सहकार्य करत राहील अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

- Advertisement -

त्रास देण्यासाठी कारवाई

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईवरुन शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. ईडीद्वारे कारवाई करुन केवळ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रकार सुरु आहे. हे आमच्यासाठी नवं नाही. यापुर्वीही देशमुखांच्या मुलाच्या व्यवसायावर केंद्र सरकारने लक्ष ठेवलं होते. परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. नैराश्यातून हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे याबदद्ल आम्हाला चिंता नाही असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुखांवरील कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार

अनिल देशमुख यांच्यावर जी काही कारवाई सुरु आहे त्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एक आदेश देऊन यासंदर्भात सगळी चौकशी सीबीआयला सोपवली आहे. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात करण्यात येणारी कारवाई न्यायालयाने निर्देशित करण्यात आलेली आहे. याचा कोणताही राजकीय अर्थ काढायची गरज नाही आहे. तपास यंत्रणा काम करत आहेत त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याचं काही कारण नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सीबीआय ज्यावेळी एखाद्या ठिकाणी छापेमारी करते तेव्हा लोकल पोलिसांऐवजी सीआरपीएफ त्यांच्या सोबत असतात असा त्यांच्या प्रोटोकॉल आहे. त्यामुळे सीआरपीएफ का आणले किती आणले याबाबत काही बोलू शकत नाही कारण मी त्यांचा प्रवक्ता नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -