घरताज्या घडामोडीचक्कर आल्याने अनिल देशमुख तुरुंगात पडले; जे. जे. रुग्णालयात दाखल

चक्कर आल्याने अनिल देशमुख तुरुंगात पडले; जे. जे. रुग्णालयात दाखल

Subscribe

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चक्कर आल्याने तुरुंगात पडले. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात देशमुख यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात छातीत दुखण्याची अनिल देशमुखांची ही दुसरी वेळ आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चक्कर आल्याने तुरुंगात पडले. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात देशमुख यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात छातीत दुखण्याची अनिल देशमुखांची ही दुसरी वेळ आहे. याआधीही छातीत दुखत असल्याने त्यांना परळच्या केईएम रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. (Anil Deshmukh Suddenly Fainted In Arthur Road Jail Admitted In J J Hospital Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख हे सध्या अर्थर रोड तुरुंगात आहेत. ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयिन कोठडीत ठेवण्यात आले आहे. कारागृहातच चक्कर येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार आज सकाळी 11 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

अर्थर रोडचे अधिकारी आणि वैद्यकिय आधिकाऱ्यांनी त्यांती तपासणी केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जेथे त्यांचा रक्तदाब जास्त असल्याचे समोर आले. त्यामुळे दोन ते तीन दिवस त्यांना अजून जेजे रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. दोन महिन्यापूर्वी देखील त्यांची अशीच तब्येत बिघडली होती.

नेमके काय आहे प्रकरण?

- Advertisement -

गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट व बार मालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.

याप्रकरणी सीबीआयने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये देशमुख व वाझे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला


हेही वाचा – ‘मोठ्या’ साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे पेटून उठलेत, नव्या युतीवरून भाजपाची टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -