घरदेश-विदेशअनिल देशमुख, ठाकरे सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

अनिल देशमुख, ठाकरे सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Subscribe

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार्‍या माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. सीबीआय चौकशीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

अनिल देशमुख आणि राज्य सरकार यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्याने सीबीआय चौकशी सुरू राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाने यावेळी महाराष्ट्रातील मोठे अधिकारी या प्रकरणात गुंतले असल्याचा उल्लेख केला. अनिल देशमुख यांची बाजू मांडणारे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना कायदा प्रत्येकासाठी समान असला पाहिजे. फक्त एका पोलीस अधिकार्‍याने काही म्हटले म्हणून त्याचे शब्द पुरावा होत नाही, असे म्हटले.

- Advertisement -

यावर सुप्रीम कोर्टाने आरोप करणारे तुमचे (अनिल देशमुख) शत्रू नव्हते, पण आरोप अशा व्यक्तीने केले आहेत जो जवळपास तुमचा राईट हॅण्ड माणूस (परमबीर सिंह) होता असे सांगितले. तसेच अनिल देशमुख आणि परमबीर सिंह या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे, असे मत सुप्रीम कोर्टाने नोंदवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -