Rajya Sabha elections: मतदानासाठी अनिल देशमुखांचा न्यायालयात अर्ज

Anil Deshmukh's application in Mumbai Sessions Court for voting in Rajya Sabha elections
Rajya Sabha elections: मतदानासाठी अनिल देशमुखांचा न्यायालयात अर्ज

राज्यसभेच्या 6 जागांसाठी एकून 7 उमेदवारांनी अर्ज भरला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार तर भाजपचे धनंजय महाडिक मैदानात आहेत. अशावेळी महाविकास आघाडी आणि भाजपला आपल्या आमदारांसह अपक्ष आणि छोट्या पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार सध्या जेलमध्ये आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा समावेश आहे. यातील अनिल देशमुख यांनी आपल्याला राज्यसभा निवडणुकीत मतदानाला परवानगी द्यावी म्हणून मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची न्यायालयात धाव –

10 जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. एकूण 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. आजा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शवेटच्या दिवसानंतर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या ही लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. या आधी महाविकास आघाडी आणि भाजपकडून एकमेकांना विधान परिषदेची एक जागा सोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, तोडगा निघू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या जेलमध्ये असलेल्या दोन आमदारांना मतदान करता यावे यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

संजय राऊतांचे गंभीर आरोप –

राज्यसभा निवडणुकीच्या पारश्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. सर्व अपक्ष आमदार महाविकास आघाडीशी जोडले गेले आहेत. मात्र, या आमदारांना फोडण्याचे, त्यांना फूस लावण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सुरू झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही उमेदवार मागे घेणार आहोत, अशा चर्चा कुठून सुरू झाल्या? याचे सूत्रधार कोण आहेत? आम्हाला माहीत आहे. आता चर्चा थांबल्या असून आमचे उमेदवार रिंगणात आहे. निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल, असादावा ही संजय राऊत यांनी केला आहे.