छातीत दुखू लागल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख केईएमच्या ICU मध्ये दाखल

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Money Laundering case mumbai court order anil deshmukh five days cbi custody

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील परळच्या केईएम (KEM Hospital) रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये शुक्रवारी अनिल देशमुखांना दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, त्याच्या औषधोपचार आणि प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, अनिल देशमुख हे 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआय कोठडीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांची स्ट्रेस थिलियम हार्ट टेस्ट (Stress thallium heart test) करायची असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची लवकरच वैद्यकीय चाचणी (Medical Test) केली जाणार असल्याचे समजते.

सचिन वाझे माफीचा साक्षीदार

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचार प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार आहे. सचिन वाझेच्या अर्जावर 30 मो रोजी सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे. मनसुख हिरेन आणि वसुलीच्या आरोपांखाली अटकेत असलेल्या सचिन वाझेंनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचे वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सचिन वाझेचाही या प्रकरणामध्ये संबंध आहे. अनिल देशमुख स्वतः १०० कोटी रुपये वसुली प्रकरण आणि मनी लाँड्रिगं प्रकरणात जेलमध्ये आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केले आहेत. सचिन वाझेंचे सीबीआय कोर्टासमोर साक्ष होणार आहे. यामध्ये सचिन वाझे काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?, सचिन वाझे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होणार