Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र CBI च्या १० तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

CBI च्या १० तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Related Story

- Advertisement -

भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आज सीबीआयने धाड टाकली. CBI ची टीम तब्बल १० तास चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांच्या घरातून बाहेर पडली. रम्यान, सीबीआयच्या १० तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. सीबीआयची टीम घरी काहीतरी शोधायला आली होती, त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, असं अनिल देशमुख म्हणाले.

सीबीआयची टीम १० तास चौकशी करुन गेल्यानंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलताना सीबीआय काहीतरी शोधायला आली होती. त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आता मी नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने कोरोना वाढतोय, त्यासंदर्भात मी कोविड सेंटर्सना भेट द्यायला चाललो आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.

दहा तासांच्या झाडाझडतीनंतर सीबीआय टीम बाहेर

- Advertisement -

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी सीबीआयचे अधिकारी PPE किट चौकशीसाठी आले. तब्बल १० तास झाडाझडती केल्यानंतर सीबीआयची टीम घराबाहेर पडली. घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू सीबीआयने ताब्यात घेतल्या, प्रिंटर आणि वस्तू पांढऱ्या कपड्यात बांधून नेल्या.

 

- Advertisement -