घर महाराष्ट्र अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर; विशेष सत्र न्यायालयाचा मोठा...

अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर; विशेष सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देऊन अडकवण्याचा प्रयत्न करणारा बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देऊन अडकवण्याचा प्रयत्न करणारा बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जयसिघांनी या प्रकरणात 20 मार्चपासून अटकेत होता. अनिल जयसिंघांनी याला खंडणी प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी कायद्यान्वये अटक करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयाने 50 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. (Anil Jaisinghani granted bail for blackmailing Amruta Fadnavis A major decision of the Special Sessions Court )

विशेष सत्र न्यायालयाने एसीबीच्यावतीनं अजय मिसार यांनी अनिल जयसिंघानींच्या जामीनाला विरोध केला. तर जयसिंघानीच्यावतीनं सुदीप पस्बोला यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीशांनी आज अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर केला. अनिल जयसिंघांनीला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचक्यावर सोडण्यात यावं, असे आदेश न्यायालयानं तापस अधिकारी रवी सरदेसाई यांनी दिले. कोर्टात दररोज हजेरी लावणे, साक्षीदारांनी न धमकावणे, अशा अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisement -

अनिल जयसिंघानीनं त्याच्या अटकेविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, पोलिसांनी केलेली अटकेची कारवाई योग्य असल्याचं म्हणत मुंबई हायकोर्टनं ती याचिका फेटाळली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती.

क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याचे 15 हजार कोटींचे मॅच फिक्सिंग नेटवर्क पोलीस तपासात उघड झालं आहे. त्याच्यावर ईडीने मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न अनिल जयसिंघांनी यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने केला होता, असा तिच्यावर आरोप आहे. अमृता फडणवीस यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आणि त्यानंतर तपास सुरू झाला आणि जयसिंघानी याला अटक करण्यात आली होती. सर्वात आधी अनिक्षाला अटक करण्यात आली त्यानंतर अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

(हेही वाचा: कुणबी प्रमाणपत्र समितीला मिळणार अधिकाऱ्यांचे बळ; जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर हालचालींना वेग )

- Advertisment -