घरताज्या घडामोडीसदावर्तेंनी पगार नसलेल्या ST कर्मचाऱ्यांना लुटलं, कर्मचारी रुजू झाल्यास कारवाई होणार नाही...

सदावर्तेंनी पगार नसलेल्या ST कर्मचाऱ्यांना लुटलं, कर्मचारी रुजू झाल्यास कारवाई होणार नाही – अनिल परब

Subscribe

राज्यातील एसटी कर्मचारी २२ एप्रिल २०२२ पर्यंत कामावर रुजू झाले तर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही असे वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पगार नसलेल्या कर्मचाऱ्यांना लुटण्याचे काम केलं असल्याचा आरोप यावेळी अनिल परब यांनी केला आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर रुजू होत असल्यामुळे महाराष्ट्रात लवकरच एसटी वाहतूक सुरळीत होईल अशी माहिती अनिल परब यांन दिली आहे. राज्यात ७९ हजार एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एका खाजगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू होण्यासाठी आवाहन केलं आहे. २२ एप्रिलपर्यंत रुजू झाल्यास कारवाई होणार नाही असे अनिल परब म्हणाले आहेत. आज जवळपास ७९ हजार ८२ एसटी कर्मचारी कालपर्यंत कामावर हजर होते. एकूण ८२ हजार १०८ कर्मचाऱ्यांची संख्या आहे. आज उद्या आणि परवा अजून ३ दिवस आहेत. या तीन दिवसांमध्ये कामावर कर्मचारी कामावर हजर होतील. कोविडपूर्व काळात जे मार्ग होते ते सर्व सुरळीत करण्याची आमची तयारी झाली आहे.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे आदेश

आम्ही हायकोर्टात मान्य केलंय की, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यांना कामावर घेऊन त्यामुळे जे निलंबीत असतील बडतर्फ असतील त्यांना कामावर घेतलं आहे. पुढील तीन दिवसांमध्ये जे कामावर येतील त्यांना रुजू करुन घेऊ, २२ तारखेपर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करु नये असे हायकोर्टाचे आदेश होते त्यामुळे आम्ही त्याचे पालन करणार असल्याचे अनिल परब म्हणाले आहे. या पूर्वीच जवळपास सातवेळा कर्मचाऱ्यांना आवाहन केलं होते. कामावर या महामंडळ कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नाही. या सगळ्या संपाच्या कालावधीमध्ये आज पाच महिन्या कामाविना राहिला त्यामुळे एसटीचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे फार मोठे नुकसान झालं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना चुकीच्या मार्गाने नेलं

एसटी कर्मचाऱ्यांबाबत वाद नाही ती त्यांची रोजी रोटी आहे. महाराष्ट्राची जननी आहे. त्यांचे वर्षानुवर्षे नातं आहे. नात्यापासून दुरावलेला माणूस जेव्हा परत येतो तेव्हा ते भावनिक होतात. एसटी कर्मचारीसुद्धा भावनिक आहेत. परंतु त्यांना वेगळ्या दिशेला नेण्यात आले. त्यामुळे त्यांचे नुकसान झालं आहे. आम्ही पहिलेही सांगितले आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. परंतु वेगळ्या मार्गाने नको त्या मागण्या करुन कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या भावनेशी खेळून काही लोकांनी संपत्ती गोळा केली परंतु एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान झालं आहे.

- Advertisement -

सदारत्नेंनी कर्मचाऱ्यांची लूट केली

गुणरत्न सदावर्ते स्वतः वकील आहेत. ते डंके की चोट पर विलीनीकर मिळवून देईल. परंतु आम्हीसुद्धा संविधान वाचले आहे त्यात असे कुठेही लिहीले नाही की विलीनीकरण करण्यात येईल. परंतु गरीब कामगारांची फसवणूक करुन त्यांना लुटण्यात आले. त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले. पैसे मोजायची मशीन लागते, गाड्या घेण्यात आल्या, मालमत्ता घेण्यात आली. या पैशाच्या जोरावर स्वतः मजा मारायची अशा प्रकारचे काम गेल्या पाच महिन्यात झाले आहे. राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या लढाईत त्रिसदस्यी समिती आणि कोर्टानेही निकाल दिला. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पदरामध्ये काही पडले नाही. कामगारांनी चुकीच्या दिशेचं नेतृत्व स्वीकारली इथेच फार मोठी चूक झाली आहे.

पहिल्या दिवसापासून एका वाक्यावर ठाम होतो. तेव्हापासून कधीही बदल केला नाही. कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळाला पाहिजे. पगाराची शाश्वती मिळायला पाहिजे आणि आमच्या नोकऱ्या गेल्या नाही पाहिजेत अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली शाश्वती दिली. सगळ्या गोष्टी कर्मचाऱ्यांसाठी केल्या होत्या. भत्ता देण्यात आला, डीए शासनाप्रमाणे दिला तो सुद्धा देण्यात आला होता. शासकीय कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात त्या कर्मचाऱ्यांना दिले होते. एसटीच्या इतिहासात एक रक्कमी वाढ करण्यात आली नव्हती ती करण्यात आली आहे. परंतु त्यांना चुकीच्या मार्गाने नेण्यात आले. असे वक्तव्य अनिल परब यांनी केलं आहे.


हेही वाचा : gunratna sadavarte: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंचा मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -