घरताज्या घडामोडीदसऱ्याच्या मुहूर्तावर आत्महत्येच्या विचारांचे दहन करू, अनिल परबांचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन

दसऱ्याच्या मुहूर्तावर आत्महत्येच्या विचारांचे दहन करू, अनिल परबांचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन

Subscribe

कोरोनामुळे एसटी खडतर मार्गावरून प्रवास करीत असली तरी त्यावर मात करण्यासाठी आपले कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. एसटीवर कितीही आर्थिक संकट ओढावले तरी कोणाचीही नोकरी जाणार नाही, याची एसटी महामंडळाचा कुटुंब प्रमुख म्हणून मी ग्वाही देतो. त्यामुळे कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी गुरुवारी केले.

पगार वेळेवर होत नसल्याने एसटीचे कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवत आहेत. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येबद्दल परब यांनी चिंता व्यक्त केली आहे. आजच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर आत्महत्येच्या विचारांचे दहन करूया, अशी भावनिक सादही त्यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांना घातली आहे.

- Advertisement -

कोरोनासारख्या संकटाच्या वेळी जेव्हा संपुर्ण देश लॉकडाऊनमुळे बंद होता त्यावेळी आपण नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य बजावत होतात. या गोष्टीचे आम्ही सर्वच साक्षीदार आहोत आणि त्याची आम्हाला जाणीव आहे. आर्थिक संकट कितीही दाट असले तरी ते दूर होईल यांची मला खात्री आहे. त्यामुळे कृपया आत्महत्येचा मार्ग पत्करु नका, असे परब म्हणाले.

एसटी महामंडळ हे एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाचा आपणही एक घटक आहात. सध्या आपली एसटीला गरज आहे. आपल्या या ऋणानुबंधनातून एसटी लवकरच भरारी घेईल. त्यातून परिस्थिती नक्कीच बदलेल. त्यामुळे आपण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. तुम्ही सर्वच आमच्यासाठी अनमोल आहात, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :  राष्ट्रवादीचा एमआयएमला झटका, लातूरमधील ५ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -