Anil Parab ED Raid : साडेतेरा तासांच्या चौकशीनंतर ईडीचं पथक परबांच्या घराबाहेर, सात ठिकाणी ईडीच्या धाडी

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money laundering Case) ईडीकडून (ED) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचसोबत शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. परबांच्या शासकीय निवासस्थानी पहाटे ईडीचे अधिकारी पोहोचले होते. मात्र, आता साडेतेरा तासांच्या चौकशीनंतर ईडीचं पथक परबांच्या घराबाहेर पडलं आहे. अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानावरील ईडीची चौकशी संपली आहे.

दापोलीतील साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम

ईडीने चौकशी केल्यानंतर अनिल परब यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आज ईडीने माझ्या शासकीय निवासस्थानासह संबंधित लोकांवर छापेमारी केली. गेल्या काही दिवसांपासून ईडीची कारवाई होणार, अशा प्रकारच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. दापोलीतील साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत. त्यांनी त्याची मालकी हक्क सांगितलं आहे. कोर्टात देखील त्यांनी दावा केला आहे. त्यांनी त्यांच्या खर्चाचे सर्व हिशोब दिले आहेत. हे सर्व असताना देखील रिसॉर्ट अद्यापही सुरू झालेलं नाहीये. असं असताना देखील पर्यावरणाची दोन कलमं लावून या रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जातं, अशा प्रकारचा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलीस स्टेशनला नोंद केला आहे, असं अनिल परब म्हणाले.

हेही वाचा : Ed Raids : अनिल परबांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरी ईडीची धाड, ‘IT’ने केली होती छापेमारी

साडेतेरा तासांच्या चौकशीनंतर ईडीचं पथक परबांच्या घराबाहेर

अनिल परबांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी ईडीने जवळपास साडेतेरा तास चौकशी केली. ईडीचे अधिकारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान आले होते. आज कॅबिनेटची सुद्धा बैठक होती. मात्र, ईडीच्या छाप्यामुळे त्यांना बैठकीला जाता आलं नाही. परबांच्या निवासस्थानावरून सहा ते सात अधिकारी बाहेर पडले आहेत. तसेच त्यांच्या घराबाहेर शिवसैनिक देखील जमले आहेत. जमीन व्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली.

मुंबई, पुणे, रत्नागिरी याठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. वांद्रे येथील खासगी घरातही ईडीच्या अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू होतं. परब यांच्या संबंधित ७ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.


हेही वाचा : सरनाईक, राऊतांनंतर अनिल परब ईडीच्या कचाट्यात