फक्त बदनामी करण्यासाठी माझा साई रिसॉर्टशी संबंध जोडला जातोय; सोमय्यांच्या आरोपांना अनिल परबांचं प्रत्युत्तर

anil parab reaction over officer jairam deshpande suspension- sai resort case dapoli and slams kirit somaiya

रत्नागिरी जिल्ह्यात 2016 अशी बांधकाम आहेत जी सीआरजेडमध्ये येतात. त्याच सीआरजेडमध्ये साई रिसॉर्ड येत, किरीट सोमय्या या 2016 लोकांच काय करणार आहे? याबाबत काही बोलत नाही, फक्त एकट्या अनिल परबची बदमानी करण्यासाठी जे माझं रिसॉर्ट नाही त्याच्याशी संबंध जोडला जातोय, म्हणत शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने दापोलीतील साई रिसॉर्टवरून अनिल परब यांनी टार्गेट करत आहेत. यात काही तासांपूर्वी या प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचं शासनाकडून निलंबन करत चौकशी सुरु केली आहे. पदावर असताना अनियमितता आरोपाखाली देशपांडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

साई रिसॉर्टशी जकीय संबंध जोडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न

किरीट सोमय्या सगळ्यांना उद्धवस्त करण्यासाठीच बसले आहेत. साई रिसॉर्टशी माझा राजकीय संबंध जोडून मला राजकीय बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तो राजकीय खेळीचा भाग आहे. पण अन्य ज्यांची काही घरं आहेत, काही लोकांची छोटी छोटी स्टक्चर आहेत. तीही यात उध्वस्त होती, यांची जबाबदारी किरीट सोमय्या घेणार का? असा सवाल करत ते म्हणाले की, याला सरकार आणि सोमय्यांना जबाबदार धरलं जाईल असंही अनिल परब  म्हणाले.

त्यांची ही नुकसान भरपाई कोण देणार?

अनिल परब पुढे म्हणाले की, आज एका अधिकाऱ्यामुळे एवढ्या लोकांचं नुकसान झालं, जर त्या अधिकाऱ्याने चुकीचं केलं नसतं तर परवानगी नाकारली असती तर 17 लोकांवरील कारवाई टळली असती. जेव्हा शासनाकडे आपण परवानगी मागतो आणि शासन देतं याचा अर्थ तो माणूस परवानगी देत नाही तो अधिकारी ती खुर्ची परवानगी देतं. त्यामुळे या 17 लोकांनी जी काही बांधकाम केली असतील त्यांच नुकसान झालं आहे, त्यांची ही नुकसान भरपाई कोण देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

किरीट सोमय्या या 2016 लोकांच काय करणार आहे?

आज त्यांच्यावर कारवाई सुरु आहे, छापेमारी सुरु आहेत. काही ठिकाणी पाडकाम झालं आहे, अजून हे पाडकाम होत राहणार, कायदा तर सगळ्यांना सारखा लागणार आहे, पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात 2016 अशी बांधकाम आहेत जी सीआरजेडमध्ये येतात. त्याच सीआरजेडमध्ये साई रिसॉर्ड येत, तशाच प्रकारची 2016 बांधकाम आहेत. किरीट सोमय्या या 2016 लोकांच काय करणार आहे? असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.

2017 साली माझा दापोलीशी काही संबंध नव्हता मग…

मला अशी माहिती मिळाला की, काल जे अधिकारी निलंबित झाले त्यांची गोंदियाची देखील काही प्रकरणं आहेत. आता या गोंदियाच्या प्रकरणाशी माझा काय संबंध आहे? असा पुन्हा सवाल उपस्थित करत अनिल परब पुढे म्हणाले की, 2017 साली मी मंत्री नव्हतो. 2017 साली माझा दापोलीशी काही संबंध नव्हता मग या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच कुठे येतो, पण जाणूनबुजून अधिकाराचा वापर करत अशाप्रकराची परवानगी मिळाली किंवा मिळवली अशाप्रकारचा आरोप केला जात आहे, असा आरोपही अनिल परब यांनी केला आहे.

या गोष्टी केवळ माझी बदनामी करण्यासाठी आहेत

गोंदियामधील कुठल्या लोकांनी बेकायदेशीर बांधकाम केलं मला माहित नाही. या सत्रामध्ये किती जणांनी बांधकाम केलं मला माहित नाही. 2016 लोकं जी एकट्या रत्नागिरीत आहेत त्या लोकांनी मला विचारून बांधकाम केलं का? या गोष्टी केवळ माझी बदनामी करण्यासाठी आहेत. त्याचा न्याय मी कोर्टात मागायचा तो मागितला आहे, कोर्टात मला न्याय मिळेल हा विश्वास आहे. त्यामुळे काल जे लोकं निलंबित झाले त्यांचा केवळ साई रिसॉर्टशी संबंध नाही अन्य प्रकरण देखील त्यात आहेत. आणि त्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ, असा इशाराही अनिल परब यांनी दिला आहे.


अँटिलिया प्रकरण : या षडयंत्रात सचिन वाझे एकटा नाही, एनआयएकडून सखोल तपास व्हावा – न्यायालय