घरमहाराष्ट्रसोमय्यांवर १०० कोटींचा दावा, अनिल परब यांनी बजावली नोटीस

सोमय्यांवर १०० कोटींचा दावा, अनिल परब यांनी बजावली नोटीस

Subscribe

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्या यांना तशी नोटीस पाठवली असून ७२ तासात उत्तर देण्यास सांगतिले आहे.

सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसेच प्रादेशिक परिवहन विभागात परब हे बदल्याचे रॅकेट चालवत असल्याचा जाहीर आरोप केला होता. त्याबाबतचे पुरावे त्यांनी सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाला दिले होते. परब यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावत अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर मंगळवारी मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी सोमय्यांचे आरोप आणि सत्य परिस्थिती यासंदर्भातली माहिती घेतल्याचे समजते.

- Advertisement -

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी बेनामी संपत्ती गोळा केल्याबाबतचे २७०० पानांचे पुरावे सोमय्या यांनी मंगळवारी मुंबईत आयकर विभागाला दिले. ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावे मी जाहीर केली होती. यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे, असे सोमय्या यानी पत्रकारांना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -