घरताज्या घडामोडीSt workers Strike : मोठी बातमी ! एसटीच्या खाजगीकरणावर परिवहन मंत्र्यांचे वक्तव्य,...

St workers Strike : मोठी बातमी ! एसटीच्या खाजगीकरणावर परिवहन मंत्र्यांचे वक्तव्य, म्हणाले…

Subscribe

विलिनीकरणावरची भूमिका ठाम...

एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आपण कोणत्या पर्यायांचा वापर करू शकतो. याबाबत आम्ही चर्चा केल्या आहेत. तसेच या तपासाची सूचना मी आमच्या कन्सल्टन्सी कंपनीला दिली आहे. एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि खर्चाबाबात चर्चा केल्याची अनिल परबांनी माहिती दिली आहे. तसेच उपलब्ध पर्यायांमध्ये खाजगीकरण हा सुद्धा एक पर्याय आहे. परंतु एसटीच्या खाजगीकरणाचा कुठलाही विचार अद्यापही केलेला नाहीये. परंतु कामगार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकार म्हणून देखील लोकांची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळे विविध पर्यायांचा विचार आम्हाला करायला लागतो आहे. असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलंय की, मी दररोज देखील सांगत असलो तरी कर्मचारी आपल्या भूमिकेवर अडून बसले आहेत. त्यांची विलिनीकरणावरची भूमिका ठाम असल्यामुळे उच्च न्यायालयाने नेमलेल्या कमिटीनुसार ते विलिनीकरण बाबतीत निर्णय घेणार आहेत. तसेच चर्चेसाठी आम्ही दारही त्यांच्यासाठी खुली केली आहेत. परंतु चर्चा नेमकी कुणासोबत करायची हा मोठा प्रश्न आहे.

- Advertisement -

कुठलंही बोलणं कामगार ऐकत नाहीयेत. भाजपाचे देखील ते ऐकताहेत की ऐकत नाहीयेत. याबद्दल आमच्या मनात शंका निर्माण झालीये. विलिनीकरणचा निर्णय हाय कोर्ट आणि कमिटीच्या हातात असल्यामुळे तो प्रश्न सोडून मी इतर प्रश्नांसाठी तयार आहे. कामगारांनी केलेल्या आंदोलनात कोणताही नेता किंवा संघटना नाहीये. त्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व कोण करणार? हे त्यांनी सांगावं. मी चर्चेला कधीही बोलवू शकतो. तसेच चर्चो देखील करू शकतो. असं परब म्हणाले.

एसटी मॉडेलवर कोणत्याही प्रकारचा विषय नाही. आमचे अधिकारी अनेक राज्यांचा अभ्यास करत आहेत. इतर राज्यांमध्ये एसटी चालवण्याची पद्धत काय आहे. कामगारांचे पगार, वेतनश्रेणी याबाबत सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतोय. त्यामध्ये बाकीच्या राज्यांचा देखील अभ्यास सुरू आहे.

- Advertisement -

आमदार गोपिचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना सांगितलं आहे की, कर्मचाऱ्यांसोबत बोलण्यास मी तयार आहे. तसेच प्रस्ताव देखील मांडण्यास मी तयार आहे. परंतु त्यांच्याकडून अद्यापही कोणताही संपर्क किंवा प्रतिसाद आलेला नाहीये. परंतु देखील त्यांच्याच मागणीवर ठाम असतील तर हा तिढा सुटणार कसा?, कारण त्यांना देखील माहिती आहे की, विलिनीकरणाचा विषय हा हाय कोर्टाकडे आहे. त्यामुळे मी त्याबाबत काही चर्चा करू शकत नाही. परंतु त्या व्यतिरिक्त काही बोलणं असल्यास त्यावर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा: AB de Villiers retires : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -