अनिल परब अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणातील सोमय्यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी

Anil Parab Unauthorised Resort case Hearing of kirit somaiya Petition at National Green Tribunal NGT tomorrow
अनिल परब अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणातील सोमय्यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी

काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केला होता. आता अनिल परब अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणी राष्ट्रीय हरित ट्रिबूनल एनजीटी येथे किरीट सोमय्यांच्या याचिकेवर उद्या, गुरुवारी सकाळी ११.३० वाजता सुनावणी होणार आहे. यासंदर्भातील माहिती स्वतः किरीट सोमय्यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

परबांची अनधिकृत रिसॉर्ट पाडणारच – सोमय्या

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना कणकवली येथील पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल परब यांची अनधिकृत रिसॉर्ट पाडणारच असा इशारा दिला होता. त्यादरम्यान सोमय्या म्हणाले होते की, ‘एक नाही तर दोन अनधिकृत रिसॉर्ट अनिल परब यांनी बांधले आहेत. ज्या रिपोर्टची चौकशी झाली, ज्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला, त्या रिसॉर्टचे नाव साई रिसॉर्ट एनएक्स आहे. अनिल परब यांनी जे रिसॉर्ट लपवण्याचा हट्टाहास केला, त्याचे नाव सी काँच रिसॉर्ट असे आहे. जी केंद्राची टीम आली होती, त्यांनी महाराष्ट्र सरकारला स्पष्टपणे सांगितले होते की, दापोली आणि मुरुडच्या समुद्र किनारी असलेले हे दोन्ही रिसॉर्ट अनधिकृत आहेत. दोन्ही रिसॉर्टमधील मालकांनी सीआरझेडचा भंग केला आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण मंत्रालयाने अनिल परब यांचा फक्त साई रिसॉर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. जो सी काँच रिसॉर्ट आहे त्याला लागून दुसरा रिसॉर्ट आहे, त्याला वाचवण्याचे पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पण आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या धरतीला हे अनधिकृत बांधकामाच्या रिसॉर्टच्या पापापासून मुक्त करणार आहोत.’


हेही वाचा – सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण : पुरावे देऊनही मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना अटक नाही – नारायण राणे