साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

दापोलीतील साई रिसॉर्ट जमीनदोस्त करण्यात यावे यासाठी किरीट सोमय्या यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.

anil parab reaction over officer jairam deshpande suspension- sai resort case dapoli and slams kirit somaiya

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे विश्वासू असलेले ठाकरे गटाचे नेते अनिल परब (anil parab) हे पुन्हा अडचणीत कोकणातील दापोली येथे असलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब आणि इतर काही जणांविरोधात आयपीसी कलम 420अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या निशाण्यावर ठाकरे गटाचे नेते होते. अशातच सोमय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात गंभीर आरोप केले. दापोली येथील साई रिसॉर्ट (sai resort)अनधिकृत असल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आता दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रुपल दिघे यांनी या संपूर्णप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात (dapoli police station) तक्रार दाखल केली. यामध्ये अनिल परब आणि इतर दोघांविरोधातसुद्धा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय ?

कोकणातील दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी मागील अनेक महिन्यांपासून भाजपचे किरीट सोमय्या हे ठाकरे गटाच्या अनिल परब यांच्याविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेताना दिसतात. साई रिसॉर्ट हे अनिल परब (anil parab) यांच्या मालकीचे असून त्यांनी पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवून बांधकाम केले असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याचबरोबर, साई रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी चुकीच्या मार्गाने जे पैसे कमावले होते ते वापरण्यात आले असा आरोप सुद्धा किरीट सोमय्या यांनी अनिल परबांवर केला होता.

दापोलीतील साई रिसॉर्ट जमीनदोस्त करण्यात यावे यासाठी किरीट सोमय्या यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. हे रिसॉर्ट पाडण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. पण त्याआधीच अनिल परब यांच्यासह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हे ही वाचा – ‘या’ प्रकल्पांचा आग्रह महाराष्ट्राला प्रदूषणाच्या विळख्यात नेणारा