Homeमहाराष्ट्रमराठवाडाAnjali Damania : संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर दमानियांनी पुकारला एल्गार; म्हणाल्या,...

Anjali Damania : संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर दमानियांनी पुकारला एल्गार; म्हणाल्या, “धनंजय मुंडेंना…”

Subscribe

Anjali Damania On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्यासारखे मंत्री आम्हाला नको आहेत, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोग येथे भेट घेतली. अंजली दमानिया आता बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत. वाल्मिक कराडची अटक आणि धनंजय मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार, असा एल्गार दमानिया यांनी पुकारला आहे. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

अंजली दमानिया म्हणाल्या, “आम्ही बीडमध्ये निघत असलेल्या मूक मोर्चात सहभागी होणार नाही. वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. दुसरं म्हणजे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद सोडण्यास भाग पाडत नाही, तोपर्यंत बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहोत. धनंजय मुंडे यांच्यासारखे मंत्री आम्हाला नको आहेत.”

हेही वाचा : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ बड्या नेत्याचं नावावर शिक्कामोर्तब, पण…

यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा मर्डर झाल्याचा दावा दमानिया यांनी पुन्हा केला आहे. “मला गुरूवारी रात्री एका व्यक्तीचं व्हॉट्सअॅपवर ऑडिओ मेसेज आले. त्या व्यक्तीनं सांगितलं की, टसंतोष देशमुख प्रकरणातील तीनही आरोपी मिळणार नाहीत. कारण, तीनही आरोपींचा मर्डर झाला आहे. तिघांचीही प्रेते कर्नाटकातील सीमेवर मिळाली आहे. याची माहिती मी पोलीस अधिक्षकांना दिली आहे. मात्र, पुढे काय कारवाई झाली, हे माहिती नाही,” असं दमानिया यांनी म्हटलं.

“देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. दुसरं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा,” अशा मागण्याही दमानिया यांनी केल्या आहेत.

हेही वाचा : संतोष देशमुख प्रकरणातील तीन आरोपींचा मर्डर, कुणी केला धक्कादायक दावा