Homeमहाराष्ट्रAnjali Damania : दमानियांनी दिले पुरावे, अजित पवार मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा; उद्याच...

Anjali Damania : दमानियांनी दिले पुरावे, अजित पवार मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा; उद्याच मुंडेंचा राजीनामा?

Subscribe

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडचे आर्थिक संबंध कसे आहेत? याचे पुरावे दिले आहेत. यानंतर अजित पवार यांनी त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला संशयित वाल्मीक कराड हा पोलिसांना शरण आला आहे. त्यांच्यावर मकोकाअंतर्गात कारवाई करण्यात आली असून सध्या तो बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते धनंजड मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत आहेत. यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया हेही मागणी करताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आज अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडचे आर्थिक संबंध कसे आहेत? याचे पुरावे दिले आहेत. यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. (Anjali Damania gave Ajit Pawar evidence of Dhananjay Munde and Walmik Karad financial connection)

अजित पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अंजली दमानिया म्हणाल्या की, जवळपास 20 ते 25 मिनिटं आमची भेट झाली. अजित पवारांचं आधी म्हणनं होतं की, बीडला जे झालं ते माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य आहे. मी त्याच कुठेही समर्थन करत नाही. त्यामुळे माझं हेच म्हणनं होतं की, तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाही. त्याचं म्हणनं होतं की, पुरावे समोर आल्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे आज मी सर्व पुरावे घेऊन त्यांना भेटायला गेला. मी त्यांना पुराव्याच्या माध्यमातून दाखवलं की, धनंजय मुंडे, धनश्री मुंडे आणि वाल्मीक कराड याचे एकत्रित व्यावसाय कसे आहेत. त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतो आहे. कंपनीमधील नफ्यामध्ये हे सर्व कसे सामील आहेत, हे दाखवून धनंजय मुंडे यांचा राजीनामा कुठल्याही परिस्थिती घेण्याची मागणी केली आहे, अशी माहिती दमानिया यांनी दिली.

हेही वाचा – Walmik Karad : शासन दरबारी निर्णय झालेला दिसतोय, बीड कारागृहाबाबत आव्हांडाचा गंभीर आरोप

अंजली दमानिया म्हणाल्या की, गृह मंत्रालयाने आमदार आणि मंत्र्यांसाठी जे निर्देश दिले होते, ते अजित पवारांना दाखवले आहेत. त्याव्यतिरिक्त लोकप्रतिनिधी कायदा 1951 प्रमाणे 102 (A) आणि 191 या दोन आर्टिकलमध्ये सरळसरळ लिहिलं आहे की, कुठलाही आमदार किंवा मंत्री स्वत:साठी किंवा त्याच्या घरच्यांसाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही. असे असताना महाजेनको कंपनीकडून मुंडे यांना कसा नफा मिळतो आहे, याचे पुरावे दिले आहेत, असे दमानिया म्हणाल्या.

अजित पवार मुख्यमंत्र्यांना दाखवणार पुरावे

दरम्यान, अंजली दमानिया म्हणाल्या की, बीडमध्ये धनंजय मुंडे यांची दहशत कशी आहे. तसेच मुंडेंचे जे समर्थकांनी बीडमध्ये केलेल्या दहशतीचे फोटो आणि व्हिडीओ अजित पवारांना दाखवले आहे. हे सर्व पाहून अजित पवार यांनी मला आश्वासन दिलं आहे की, उद्या दुपारी 12 वाजता त्यांची (अजित पवार) आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. या भेटीवेळी मी त्यांना दिलेल्या सर्व पुराव्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील आणि निर्णय घेतली. परंतु संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्घृणपणे करण्यात आली. त्याबद्दल जनमानसात संताप, आक्रोश आहे. त्यामुळेच मी या प्रकरणात लढा देत आहे. संतोष देशमुख यांच्यासोबत जो प्रकार घडला, तसा प्रकार भविष्यात अन्य कोणासोबत घडू नये. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेणे गरजेचे आहे. मला खात्री आहे की, जनभावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय ते एकत्रितपणे घेतली. त्यामुळे आता उद्या काय निर्णय घेतात हे पाहू, असे अंजली दमानिया म्हणाल्या. त्यामुळे उद्या धनंजय मुंडे हे राजीनामा देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – Walmik Karad : कराडवर उपचार करणाऱ्या डॉ. थोरातांबद्दल दमानियांचे सवाल; सुरेश धसांनी केली पाठराखण