Homeताज्या घडामोडीBEED : बस करा टोलवाटोलवी अन् मुंडेंचा राजीनामा घ्या; फडणवीसांच्या वक्तव्यावर अंजली...

BEED : बस करा टोलवाटोलवी अन् मुंडेंचा राजीनामा घ्या; फडणवीसांच्या वक्तव्यावर अंजली दमानियांचा संताप

Subscribe

बस करा टोलवाटोलवी आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, असं म्हणत समाजसेवक अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.

मुंबई : बस करा टोलवाटोलवी आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, असं म्हणत समाजसेवक अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्धाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका हीच अधिकृत भूमिका असेल, असं म्हटलं. त्यावरून समाजसेवक अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. (Anjali Damania On cm devendra Fadnavis Beed Santosh Deshmukh Murder Case News In Marathi)

समाजसेवक अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. त्यानुसार, “आत्ता फडणवीस दिल्लीत म्हणाले की अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य आणि अजित पवार म्हणाले जो निर्णय मुख्यमंत्री घेतील तो मान्य. मतितार्थ असा, की ह्या दोघांची आता खात्री पटली आहे की निर्णय घ्यायला हवा. पण कोण घेणार हे ठरत नाही. बस करा ही टोलवाटोलवी. आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या”, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

“मंत्री धनंजय मुंडे हे त्यांच्या कामानिमित्त दिल्लीत आले होते. मी माझ्या कामानिमित्त आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही. मात्र सकाळी आमची भेट झाली. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. कुठल्याही कामासाठी ते मला कधीही भेटू शकतो आणि मी त्यांना कधीही भेटू शकतो. त्यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजित पवारांची भूमिका हीच अधिकृत भूमिका असेल”, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर आपलं मत व्यक्त केलं.


हेही वाचा – Devendra Fadnavis : ठाकरे-भाजप एकत्र येण्यावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…