घरमहाराष्ट्रअंजली दमानियांचे आमच्याविरोधात कटकारस्थान रचण्याचे काम, समीर भुजबळांचा आरोप

अंजली दमानियांचे आमच्याविरोधात कटकारस्थान रचण्याचे काम, समीर भुजबळांचा आरोप

Subscribe

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपांचे खंडन समीर भुजबळ यांच्याकडून करण्यात आले आहे. याबाबत समीर भुजबळ यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समीर भुजबळ यांनी दमानियांच्या विरोधात आरोप केले आहेत.

मुंबई : शुक्रवारी (ता. 17 नोव्हेंबर) जालन्यातील अंबड येथे ओबीसींची महाएल्गार सभा पार पडली. या सभेत सराकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाषण केले. परंतु, या भाषनानंतर त्यांच्यावर अनेकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील काल शनिवारी (ता. 18 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ आणि त्यांचा मुलगा समीर भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काल अंजली दमानिया मुंबईत भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या; पण पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यानंतर दमानिया यांनी आपल्‍या घरीच पत्रकार परिषद घेत भुजबळांवर गंभीर आरोप केले. या आरोपांचे खंडन समीर भुजबळ यांच्याकडून करण्यात आले आहे. याबाबत समीर भुजबळ यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समीर भुजबळ यांनी दमानियांच्या विरोधात आरोप केले आहेत. (Anjali Damania’s conspiracy against us, Sameer Bhujbal’s allegation)

हेही वाचा – अंजली दमानियांच्या आरोपांवर समीर भुजबळांचा खुलासा, म्हणाले – “हा त्यांचा मीडिया स्टंट”

- Advertisement -

नाशिक येथील फार्म हाऊसवरून समीर भुजबळ यांनी प्रसार माध्यमांसमोर या प्रकरणाचा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही फर्नांडिस कुटुंबियांचा मोबदला रहेजा आणि नर्होणा यांना दिला होता. पुन्हा एकदा जेव्हा इमारतीचे काम पूर्ण झाले तेव्हा 2014 मध्ये मोबदला घ्या म्हणालो होतो. तेव्हा त्यांनी संपूर्ण कागदपत्रांवर सह्या केलेल्या होत्या. पुन्हा त्यांनी येऊन इंटरेस्ट नसल्याचे सांगितले होते. आम्ही जो सहानुभूतीपूर्वक मोबदला देणार होतो, तो राहून गेला. जागा घ्या किंवा पैसे घ्या.. म्हणत होतो. परंतु त्यांचे उत्तर आले नाही.

तसेच, दमानिया यांनी आमच्यावर अनेक आरोप केलेले होते. त्यानंतर आमच्या अनेक प्रॉपर्टी ईडीने अॅटॅच केलेल्या आहेत. त्यातच ही इमारतदेखील जोडली गेलेली आहे. आता दमानिया यांनी आमच्याविरोधात कटकारस्थान रचण्याचे काम केले आहे. प्रकरण कोर्टात असून कोर्ट जो निकाल देईल, तो आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका समीर भुजबळ यांच्याकडून मांडण्यात आली.

- Advertisement -

सध्या राज्यात ओबीसींची मोठी लढाई राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि आम्ही लढत आहोत. शुक्रवारी झालेली सभा पाहता यात राजकारण करण्यासाठी अंजली दमानिया यांनी मीडिया स्टंट केला. आमचे देणे लागत नसतानाही माणुसकीच्या नात्यातून आम्ही मोबदला देण्याची तयारी दर्शविली. मात्र तरी देखील दमानिया यात राजकारण आणून आपली पोळी भाजून घेत आहेत, असा उलट आरोपही याआधी समीर भुजबळ यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -