Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अजित पवारांची अवस्था कशी? अंजली दमानिया यांनी केलेल्या 'या' दाव्यामुळे पुन्हा खळबळ

अजित पवारांची अवस्था कशी? अंजली दमानिया यांनी केलेल्या ‘या’ दाव्यामुळे पुन्हा खळबळ

Subscribe

अंजली दमानिया यांना अजित पवार यांचं बंड अजूनही थांबलेलं आहे असं वाटत नाही. या संदर्भात अंजली दमानिया यांनी मोठं विधान केलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील संभाव्य भूंकप टाळला गेला आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांनाही चेकमेट बसला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना अजित पवार यांचं बंड अजूनही थांबलेलं आहे असं वाटत नाही. या संदर्भात अंजली दमानिया यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार भरपूर काम करतात. भ्रष्टाचारही करतात. त्याविरोधात मी लढलेही आहे. अजित पवार यांची आता ना घर का ना घाटका अशी परिस्थिती झाली आहे. ते शांत बसतील असं मला वाटत नाही येत्या काही दिवसांत, महिन्यांत म्हणजे दिवाळीपर्यंत ते पुन्हा दगाफटका करतील यात शंका नाही, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. (Anjli Damaniya claimed that ajit pawar joined soon bjp maharashtra politics )

अंजली दमानिया शरद पवार यांच्या राजीनाम्यावर बोलताना म्हणाल्या की, शरद पवार हे त्यांच्या बोलण्यावर ठाम राहिले असते तर सगळ्यांना आनंद झाला असता. त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावर ठाम राहायला हवं होतं. नव्या नेतृत्त्वाला संधी द्यायला हवी होती. पण ते शरद पवार आहेत. ते शेवटपर्यंत सत्ता सोडणार नाहीत. शेवटपर्यंत पद सोडणार नाहीत, असं दमानिया म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

दमानिया म्हणाल्या की, शरद पवार यांनी खेळी करुन ब‌‌ॅटही माझी आणि चेंडूही माझा हे दाखवून दिलं आहे. पण ही स्टोरी बोगस आहे. येत्या काही दिवसात ते दिसून येईल. अजित पवार यांची खेळी अजून संपलेली नाही. येत्या काही दिवसात ते आपल्या आमदारांना गोळा करुन मोठा दगाफटका करतील, असा दावाही दमानिया यांनी केला आहे.

( हेही वाचा: राज ठाकरेंचा रत्नागिरीमधून सत्ताधारी विरोधकांवर निशाणा; म्हणाले… )

- Advertisement -

शरद पवार यांनी खेळी करुन बॅटही माझी आणि चेंडूही माझा हे दाखवून दिलं आहे. पण ही स्टोरी बोगस स्टोरी आहे. येत्या काही दिवसात ते दिसून येईल. अजित पवार यांची खेळी अजून संपलेली नाही. येत्या काही दिवसात ते आपल्या आमदारांना गोळा करुन मोठा दगाफटका करतील, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

- Advertisment -