Anvikikahani: अंकिता लोखंडे अन् विक्की जैननी दिलं राज्यपालांना लग्नाचं आमंत्रण

दोघांनी लग्नाची भली मोठी आकर्षक लग्न पत्रिका तयार केली आहे.

Ankita Lokhande and Vicky Jain gave wedding invitation to the Governor Bhagat singh koshyari
Anvikikahani: अंकिता लोखंडे अन् विक्की जैननी दिलं राज्यपालांना लग्नाचं आमंत्रण

एकीकडे विक्की कतरिना तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा बॉयफ्रेंड विक्की जैन यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. १४ डिसेंबरला विक्की जैन आणि अंकिता विवाह बंधनात अडकणार आहेत. नुकतेच अंकिताचे लग्नाआधीचे काही विधी पार पडले. दोघांच्या लग्नाची बॉलिवूड तसेच हिंदी टेलिव्हीजनच्या अनेकांना नामवंत लोकांना लग्नाचे आमंत्रण दिले आहे. त्याचप्रमाणे विक्की आणि अंकिताच्या लग्नाला राज्याचे राज्यापाल भगतसिंह कोश्यारी देखील हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. अंकिता आणि विक्की यांनी स्वत: राज्यपालांना राजभवनावर जाऊन लग्नाचे आमंत्रण दिलं आहे. अंकिताने तिच्या सोशल मीडियावरुन राज्यपालांना लग्नाचं आमंत्रण देतानाचे फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिता आणि विक्की यांनी त्यांच्या लग्नाची खास पत्रिका राज्यपालांना देतानाचे फोटो पोस्ट करत राज्यपालांचे आभार मानले आहेत. अंकिताने लिहिलं आहे की, ‘महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी यांनी मला त्यांना भेटण्यासाठी वेळ दिला यासाठी मी त्यांची आभारी आहे. मला माहिती आहे तुम्ही फार व्यस्त असता मात्र त्यातून वेळ काढून राजभवनावर तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे आभार’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

 

राज्यपालांना आमंत्रण देण्यासाठी गेलेल्या अंकिताने व्हाइट कलरची साडी तर विक्कीने व्हाइट कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट घातली आहे. दोघांनी लग्नाची भली मोठी आकर्षक लग्न पत्रिका तयार केली आहे. फोटोमध्ये विक्की जैन लग्नाच्या पत्रिकेचा बॉक्स उघडताना दिसत आहे. निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये विक्की आणि अंकिताच्या लग्नाची चौकोनी पत्रिका राज्यपाल वाचताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिता आणि विक्की जैन यांच्या लग्नासाठी त्यांचे फॅन्स फार आतुर आहेत. नुकतीच अंकिताची बॅचलर्स पार्टी पार पडली ज्यात अंकिता तिच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत एन्जॉय करताना दिसत होती. अंकिताने पार्टीचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.


हेही वाचा – Rait Zara Si Song: अतरंगी रेचं दुसर गाणं प्रदर्शित, अरजीत सिंहच्या आवाजात साराची लव्ह स्टोरी